÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार*
==============÷÷÷÷÷÷÷
मुंबई : बल्लारपूर मतदार संघातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल मतदार संघातील जनतेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.
विपुल खनिज संपत्ती आणि वन संपदा निसर्गाकडून लाभलेल्या बल्लारपूर मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टीने महाराष्ट्राच्या यावर्षीच्या अर्थ संकल्पात उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय संवेदनशीलपणे विचार केला आहे. मतदार संघातून जाणाऱ्या राज्यमार्ग मजबुतीसाठी ४१ कोटी तसेच
प्रमुख जिल्हा मार्गांच्या विस्तारासाठी १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून
ग्रामीण भागातील रस्ते विकासाकरिता २०.१० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत ; अशाप्रकारे एकूण ७५ कोटी रुपयांची तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अर्थसंकल्पात बल्लारपूर करीता करण्यात आली आहे.
याशिवाय हायब्रीड अन्युटी प्रोग्रॅम अंतर्गत जवळपास ८०० कोटी रुपये किंमतीच्या ४ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पांचा डीपीआर तयार करण्यासाठी १ कोटी ७१ लाख रुपयांची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तरतूद करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पात विविध विकास योजना आणि समाजातील प्रत्येक माणसाला दिलासा मिळाला आहे. याबद्दलदेखील ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.
ज्या मतदारराजाने मोठ्या विश्वासाने आपल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी दिली आहे ती समर्थपणे पार पडण्याकरीता सरकार म्हणून आपले निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहेत असे ना सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
==========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793