* महिलांनी स्‍वतःमधील शक्‍ती ओळखुन सक्षम बनावे व इ* तरांनाही सक्षम करावे – सौ. शिल्‍पा पाचघरे *

0
36

===================

बाळाची काळजी कशी घ्‍यावी, वेळोवेळी त्‍याचे लसीकरण कसे करावे याबद्दल झोपडपट्टीतील महिलांना प्रशिक्षीत करते. सौ. मेघना शिंगरू म्‍हणाल्‍या की, आज स्‍त्रीने पुरूषांच्‍या बरोबरीने खांदयाला खांदा लावून प्रत्‍येक क्षेत्र काबीज केले आहे. आज महिला प्रत्‍येक क्षेत्रात उतरली आहे. चंद्रपूरमध्‍ये अनेक कार डेकारेचे शॉप आहेत, जे पुरूष चालवितात आणि म्‍हणूनच मलाही वाटले की, आपणही हे काम करू शकतो आणि म्‍हणून महानगरामध्‍ये माझेही मेघना कार डेकोर शॉप आहे. त्‍याद्वारे मी इतर महिलांनाही सांगत असते की, आपल्‍या मधील गुण ओळखुन काम करा तसेच हे सर्व सांभाळून मी नाटयक्षेत्रात देखील काम करीत आहे.  सामाजिक कार्यकर्त्‍या भारती गुंदेजा म्‍हणाल्‍या की, आज आपल्‍या घरामध्‍ये अनेक गरजु महिला काम करतात. अनेक महिलांची इच्‍छा असते की एकदा तरी वैष्‍णवदेवीचे दर्शन घ्‍यावे अशी इच्‍छा माझ्या घरी काम करणा-या महिलेने देखील बोलुन दाखविली. तेव्‍हा मी विचार केला की, आपण पुढाकर घेवून अशा सर्व महिलांना वैष्‍णोदेवीचे दर्शन करवून आणावे आणि बघता बघता १०२ कामकरी महिलांनी यात यात्रेसाठी सहभाग नोंदविला आणि १०२ महिलांना वैष्‍णोदेवीचे दर्शन करण्‍याचे सौभाग्‍य मला लाभले. यात मला माझे पती नितीन गुंदेचा भरपूर सहकार्य दिले. अर्चना मानलवार म्‍हणाल्‍या की, मी जरी दिव्‍यांग असले तरीही मी मनाने सुदृढ आहे आणि म्‍हणूनच माझे सारख्‍या इतर बहिणींना काय अडचण येत असेल याची जाणीव मला आहे. तरी त्‍या हाता-पायाने अधू असल्‍या तरीही त्‍यांनी समाजामध्‍ये आपल्‍या कार्याने मान उंच करून जगले पाहीजे. याकरिता मी त्‍यांना सक्षम करण्‍याकरिता गृहउद्योगाचे धडे देते आणि त्‍या माध्‍यमातुन एक वेगळे समाधान त्‍यांच्‍या चेह-यावर बघुन मलाही आनंद होते.

==≠====================

या कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेकरिता सौ. शिला चव्‍हाण महामंत्री, छबु वैरागडे, वंदना संतोषवार ओबीसी मोर्चा, भाजपा उपाध्‍यक्षा, महिला मोर्चा उपाध्‍यक्षा रेणु घोडेस्‍वार, विशाखा राजुरकर, प्रभा गुडधे, चंद्रकला सोयाम, स्मिता रेभनकर, मसराम ताई, माजी नगरसेविका पुष्‍पा उराडे, वंदना तिखे, माया उईके, सचिव सिंधु राजगुरे, रमिता यादव, सौ. उज्‍वला नगराळे, सौ. पुष्‍पा शेंडे, सारिका उराडे, शालु कनोजवार, वर्षा सोमलकर, सौ. चिंता, कलाकुरवार ताई, सौ. प्रिती सरकार, अभिलाषा मेंदळकर, खुशिया लोकसंचालित समितीच्‍या सर्व कार्यकर्ता आणि असंख्‍य कार्यकर्ता भगिनींचा सहभाग लाभला. या कार्यक्रमाचे संचालन विशाखा राजुरकर यांनी तर आभार प्रदर्शन उज्‍वला नगराळे यांनी केले.

=====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

====≠===============≠

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here