========================
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महानगर चंद्रपूरतर्फे ‘सुषमा स्वराज्य सन्मान’ देवून दिनांक १२ मार्च २०२३ रोजी श्री माता कन्यका परमेश्वरी सभागृहामध्ये ८ मार्च महिला दिनानिमीत्त महानगरातील हिरकणी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराजभैय्या अहीर यांच्या मार्गदर्शनात व महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा मा. सौ. चित्राताई वाघ यांचे सुचनेनुसार घेण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपाचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे आणि महानगराच्या समन्वयक मा. शिल्पाताई पाचघरे प्रामुख्याने उपस्थित होत्या. हा कार्यक्रम सौ. अंजली घोटेकर जिल्हाध्यक्षा महिला मोर्चा महानगर चंद्रपूर यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये डॉ. सौ. प्रेरणा कोलते-आरूषी फाऊंडेशन, डॉ. प्रिती सरबेरे-माधवबाग, सौ. भारती गुंदेचा–सामाजिक कार्यकर्त्या, अर्चना मानलवार–ज्ञानार्जना दिव्यांग सेवा समिती, सौ. रमा गर्ग–रोटरी क्लब, सौ. पुनम कपुर–स्मार्ट सिटी, डॉ. विद्या बांगडे–रोटरी क्लब, प्रा. विजयालक्ष्मी पारिख– पहिली टोफु उत्पादक, शारदा हुसे–खुशिया लोक संचालित सेवा समिती, मेघना शिंगरू–उद्योजिका, सौ. शालिनी शंकर टेकाम–आशावर्कर यांचा स्व. सुषमा स्वराज अवार्ड ट्रॉफी, शॉल देवून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्षा सौ. अंजली घोटेकर यांनी केले आणि त्यांनी या कार्यक्रमाचे महत्व विशद करून सांगीतले. यावेळी महानगर समन्वयक शिल्पा पाचघरे म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे नेहमी आगळे-वेगळे कार्यक्रम घेण्यात येतात. आज महिला कोणत्या क्षेत्रात कमी नाही. स्वतःचे घर सांभाळुन पुरूषाच्या खांदयाला खांदा लावून समाजात काम करीत आहे. प्रमुख पाहुणे महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेशजी गुलवाडे म्हणाले की, भारतीय जनता महिला मोर्चातर्फे अतिशय चांगला कार्यक्रम घेण्यात आला. आज ख-याअर्थाने महिला सक्षम झाल्या आहेत. आपल्या सोबतच त्या इतर महिलांना सुध्दा स्वयंरोजगाराकडे वळवित आहे. महिलांनी आपली शक्ती ओळखुन काम केले पाहीजे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सौ. शिला चव्हाण महामंत्री, छबु वैरागडे, वंदना संतोषवार ओबीसी मोर्चा, भाजपा उपाध्यक्षा, महिला मोर्चा उपाध्यक्षा रेणु घोडेस्वार, विशाखा राजुरकर, प्रभा गुडधे, चंद्रकला सोयाम, स्मिता रेभनकर, मसराम ताई, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, वंदना तिखे, माया उईके, सचिव सिंधु राजगुरे, रमिता यादव, वंदना radharpwar ,उज्वला नगराळे, सौ. पुष्पा शेंडे, सारिका उराडे, शालु कनोजवार, वर्षा सोमलकर, सौ. चिंता, कलाकुरवार ताई, सौ. प्रिती सरकार, अभिलाषा मेंदळकर, खुशिया लोकसंचालित समितीच्या सर्व कार्यकर्ता आणि असंख्य कार्यकर्ता भगिनींचा सहभाग लाभला. या कार्यक्रमाचे संचालन विशाखा राजुरकर यांनी तर आभार प्रदर्शन उज्वला नगराळे यांनी केले.