*सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ठेवावे या मागणीस आम आदमी पार्टी भद्रावतीचा जाहीर पाठिंबा.*

0
65

======================= 

* भद्रावती * 

================

आज दिनांक 15 मार्चला आम आदमी पार्टी तालुका भद्रावती तर्फे राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाला संपूर्णपणे पाठिंबा देत आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन चा प्रश्न लवकरात लवकर सरकारने सोडवावा ही मागणी घेऊन निवेदन सादर करत आहे. जुनी पेन्शन जेव्हापासून बंद झालेली आहे तेव्हापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा सुरक्षा नष्ट झाली होती. आम आदमी पार्टी या निवेदनाद्वारे सरकारला प्रश्न करीत आहे की जर सरकार आमदार खासदारांचे नेत्यांचे जुने पेन्शन सरकारी तिजोरी मधून बरोबर देत होते आणि आताही देत आहे तर राज्य सरकारी कर्मचारी तीस- चाळीस वर्ष सरकारी सेवा प्रदान करून सुद्धा जुनी पेन्शन का बर बंद करण्यात आली या केंद्र सरकारच्या निर्णयाचा आम आदमी पार्टी तीव्र निषेध करते. राज्य सरकारने हा विषय वेळेमध्ये न सोडल्याने राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेलेले आहे. तरी याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे त्यामुळे अति संवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली आहे. परिस्थितीची जिम्मेदारी राज्य सरकारने त्वरित घेऊन यावरती तात्काळ निर्णय लावावा ही आम आदमी पार्टी भद्रावतीची मागणी आहे. यावर तात्काळ निर्णय न घेतल्यास सर्वसामान्यांना घेऊन आम आदमी पार्टी विविध पद्धतीने तीव्र आंदोलन करेल. तरी मुख्यमंत्री महोदय यांनी लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढावा ही विनंती. त्यावेळी आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरज भाऊ शहा, शहर उपाध्यक्ष सुमीत हस्तक, तालुका अध्यक्ष सोनाल पाटिल, शहर उपाध्यक्ष आशिष भाऊ तांडेकर, शहर सचिव विजय सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिलकुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर सहसचीव सचिन पाटील, महिला शहराध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, शहर महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, प्रफुल्ल शेलार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here