*गुरुनगर वार्ड येथील जिओ टावर ला आम आदमी पार्टी भद्रावती व स्थानीक लोकांचा विरोध.*

0
89

=======================

 * भद्रावती *.

====================

. 23/03/2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे निवेदन देण्यात आले की भद्रावती येथील गुरुनगर वार्डमध्ये मालकीच्या प्लॉट वरती जिओ कंपनीच्या v टावरची परवानगी देण्यात आली आहे व त्याला स्थानिक लोकांचा विरोध आहे. कोणत्याही स्थानिक लोकांना विश्वासात न घेता शासनाने जिओ कंपनीचे टावरचे परवाने दिलेले आहे. गुरुनगर येथील मानवी वस्तीमध्ये स्थानिक लोकांना कोणती पूर्वसूचना न देता 6G टॉवरचे बांधकाम सुरू केले आहे. हा जिओ कंपनीचा टावर जीआर अनुसार अवैध आहे. टॉवर जीआरच्या अनुसार कोणतेही टावर जंगल भागात तसेच शेत शिवारात बसवण्यात येऊ शकते परंतु मानवी वस्तीमध्ये शैक्षणिक क्षेत्राच्या तसेच इस्पितळांच्या 100 मीटर दूर पाहिजे, परंतु गुरुनगर येथील टॉवर उभारणीचे कामामध्ये जीआर चे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाविरोधात स्थानिक लोकांचा रोष निर्माण झालेला  आहे. या अगोदर सुद्धा प्रभाग क्र. 13 गवराळा येथे असाच प्रकारे टॉवर उभारणीच काम करण्यात येत होते त्या वेळी आम आदमी पार्टी ने त्याचा विरोध करुन नगर परिषद भद्रावती ला त्याची ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात भाग पाडले होते, त्यामुळे जर याकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष राहील तर आम आदमी पार्टी भद्रावती शहर व तालुका टिम स्थानिक लोकांसमवेत आंदोलनाची तयारी सुद्धा करणार आहे, आणि या शासनाच्या स्थानिक लोकांवर लादण्यात आलेल्या निर्णयाला संपूर्णपणे विरोध दर्शवणार आहे. निवेदन सादर करतांना आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरज  शहा, शहर उपाध्यक्ष सुमीत हस्तक, तालुका अध्यक्ष सोनाल पाटिल, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर सचिव विजय सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिलकुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर सहसचीव सचिन पाटील, महिला शहराध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, शहर महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, बलुभाऊ बांदुरकर, प्रफुल्ल शेलार व इतर कार्यकर्ते व स्थानिक वार्ड रहिवासी उपस्थित होते.

====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*. 

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here