* ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीं यांचा जाहीर निषेध *

0
54

=======÷÷÷÷÷=======

*;भाजपा चंद्रपूर करणार राहुल गांधी विरोधात जटपुरा गेट येथे आंदोलन *. 
======================÷
*भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे  यांची माहिती * 
=======================
मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा जिल्हा चंद्रपूर कडुन जटपूरा गेट येथे उद्या आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल देवराव भोंगळे यांनी आश्चर्य व्यक्त केले.
=================÷÷====

श्री. देवराव भोंगळे यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ”मोदी ” या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना  ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला. न्यायालयाने या बद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.  राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते.  न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व  संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी   न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल, असेही ते म्हणाले.

========================
सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते , असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते.   मोदी या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत , डॉक्टर आहेत , इंजिनीअर आहेत , व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.आपण कोणालाही अपमानित करावे  हा आपला अधिकार आहे असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असेही देवराव भोंगळे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 
====================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here