==================
=====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
====================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793
==================
========================
चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे युवानेते अजय सरकत यांच्या पुढाकाराने गुढीपाडव्याच्या निमित्ताने बंगाली कॅम्प प्रभाग क्र.4 अष्टभुजा रमाबाईनगर येथे भव्य महाआरोग्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचा परिसरातील हजारो नागरिकांनी लाभ घेतला.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक व अध्यक्ष म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री सुभाष कासंगोट्टुवार,रवींद्र गुरनुले,ब्रिजभूषण पाझारे ,विशाल निंबाळकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
यावेळी डॉ गुलवाडे म्हणाले,चंद्रपूर येथील वाढते प्रदूषण, येथील नागरिकांच्या सध्याच्या व्यस्त जीवनामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेला मानसिक तणाव, लोकांचे खानपान व बदललेली जीवन शैली यामुळे लोकांच्या शरीरात निरनिराळ्या व्याधींनी जन्म घेतला आहे,हे लक्षात घेता शहरातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व आरोग्य तपासण्या करता याव्या,रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून या शिबिराचे आयोजन आहे.आरोग्याच्या वाढत्या समस्यांना सामोरे जाणे टाळायचे असेल तर प्रत्येक प्रभागात असे आयोजन करा असे आवाहन त्यांनी केले.
शिबिरात बी.पी., शुगर संबंधित विविध आजारांबाबत तपासण्या करण्यात येऊन निःशुल्क औषधे वितरित करण्यात आली. शिबिरात शहरातील डॉ. अमल पोद्दार, डॉ. सुजय कोतपल्लीवर, डॉ. अभिजित संखारी, डॉ. किरण देशपांडे, डॉ. विधान बिस्वास, डॉ. सत्यजित पोद्दार, डॉ. राजू सुरगानी, डॉ. यशवंत कन्नमवार यांनी सेवा दिली.यशस्वीतेसाठी मानकुमारी गोलदार, मिनोती सरकार, इतिमा देवनाथ,झरना बर्मन, सुरेश बेपारी, माधव मंडल,प्रबीर देवनाथ, इंद्रोजीत बचार,श्यामोल दास, रॉबिन मंडल,सत्यजीत दास,ऋषभ परचाके यांनी परिश्रम घेतले.