रेड झोन असलेल्या नदीकाठ भागातील ले-आऊट ला नियमबाह्य परवानगी?

0
71

==================

* निलेश ठाकरे*

==================

🔸बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉबीकडून नियमांची एैशी तैशी !

====================

चंद्रपूर,२४ मार्च २०२३:

=============≠===

चंद्रपूर शहरात सध्या बिल्डर्स अँड डेव्हलपर्स व्यापारी भूमाफियांकडून महापालिकेच्या रेड झाेन अंतर्गत येणाऱ्या भागात प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली करित पायदळी तुडवून अगदी नदीच्या थडीवरील व नदीला पुर येणाऱ्या परिसरात ठीक ठिकाणी ले-आऊट टाकून कोट्यावधी रुपयांची माया जमविण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. मात्र अश्या ले- आऊट धारकांवर प्रशासनाच्या वतीने कुठलीही कारवाही होतांना दिसुन येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे शहरात असे अनेक भुमाफिया आहेत की ते सत्ताधारी राजकारणी नेत्यांच्या जवळचे नातेवाईक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

==================

चंद्रपुर महानगरपालिकेने नदीकाठावरील जो भाग रेड झोन, फ्लड झाेन म्हणून घोषित केला आहे त्या भागात शहरातील भुमाफिया लॉबी मार्फत मोठ्या प्रमाणात नियमबाह्य पद्धतीने ले- आऊट्स टाकणे सुरु आहे. सदरहू ले-आऊट्स ला टाऊन प्लानिंग विभागाकडुन परवानगी कशी मिळत आहे. आपल्या आर्थिक लाभापोटी कुण्या अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग तर नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असून याबाबत चंद्रपूर नगरीत सर्वत्र चर्चा होतांना दिसत आहे. या गंभीर बाबींकडे अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

===================

मागील वर्षी पावसाने चंद्रपुर जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या नदीकाठाजवळ वास्तव्य करणाऱ्या अनेक लोकांची घरे जलमय झाली होती. अनेकांचे उपजिवीकेच्या साधनांचे मोठया प्रमाणात नुकसान सुध्दा झाले. त्याची नुकसान भरपाई देवून प्रशासनाने त्यावेळी आर्थिक मदतही केली होती. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नदीच्या परिसरात राहणाऱ्या पुरपिडीत जागेचा दाैरा करून प्रशासनाला नदीकाठी ले-आऊट टाकण्याची परवानगी देवु नये म्हणून संबंधित विभाग व त्यातील अधिका-यांना तंबी देत तसे आदेश दिले. अनेक सामाजिक संघटनांमार्फत प्रशासनाला निवेदनेही देण्यात आले. मात्र यानंतर पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवू नये, या दृष्टीने चंद्रपूरच्या ज्या भागात पूराचे पाणी येत असते त्या भागाला चंद्रपूर महानगरपलिकेने रेड झोन व फ्लड झाेन परिसरात बॅनर लावुन प्लाट धारकांना तेथील प्लाट खरेदी करू नये म्हणून त्यावेळी जनजागृती केली होती. मगं आता अस काय झालंय की, महानगरपालिकेने जो भाग आधिच रेड झोन,फ्लड झाेन म्हणून घोषित केला. तिथे पुन्हा त्याच भागात भुमाफिया लॉबी यांच्या कंपण्यानी मोठ्या प्रमाणात ले-आउट टाकत आहे. सदर परिसर रेड झोन,फ्लड झाेन ऐरिया असतांना या ले-आउटला परवागी मिळाली कशी? दिली तर कुणी दिली? परवानगी नसेल तर मग ले- आऊट विकणाऱ्यांवर कारवाही कां करण्यात येत नाही? असा प्रश्न चंद्रपुर येथील नागरिकांना पडला आहे.

==================

हा परिसर फ्लड झोन असताना सुद्धा ही लॉबी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लेआउट पाडून सदर प्लॉट ला आम्ही भविष्यात विकसित करून देवु अश्या प्रकारचे खाेटे आश्वासन देवुन जनतेला विकून त्यांची दिशाभूल करत आहे. चंद्रपूर बिनबा गेट ते चोराळा व नगिनाबाग जेबी नगर,सिस्टर कॉलनी,रहमत नगर या परिसरात या भुमाफिया लॉबींने अक्षरश: प्लाट विकण्याचा उदमाद मांडला आहे. मोठ-मोठे लेआउट टाकल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे. मात्र मागील काही महिन्यापूर्वीच चंद्रपूर शहर महानगरपालिकाच्या वतीने या भागाचा सर्वे सुद्धा करण्यात आले होते. कोणते कोणते भाग हे फ्लड झोन मध्ये आहे, याची सुद्धा त्यांच्या माध्यमातून सर्वे साहानिशा केल्या गेली. मात्र रेड झोन मध्ये असताना सुद्धा या भागामध्ये या भुमाफियांनी ले – आउट टाकले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहे. या भुमाफिया लॉबीला राजकिय नेत्यांपेैकी आशिर्वाद कुणाचा असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र हे ले – आउट टाकताना यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल तर नाही झाली ना अशी शंका आता जनतेत व्यक्त केली जात आहे.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=============≠========

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here