* अयोध्या श्री राम मंदिरासाठी लागणाऱ्या काष्ठचे बुधवारी पूजन व शोभायात्रा *

0
53

====================

* अरुण गोविल,दीपिका,सुनील लहरी,गायक कैलास खेर, यांची उपस्थिती *.  
======================

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरच्या जंगलातील सागवान लाकडाचा उपयोग केला जाणार आहे.श्री राम नवमीच्या पावनपर्वावर आदल्या दिवशी 29 मार्च  बुधवार 2023 ला बल्लारपूर येथून पवित्र सागवान काष्ठाची भव्य शोभायात्रा चंद्रपूर येथे येणार आहे.या शोभयात्रेत जग प्रसिद्ध रामायण धारावाहिकेत प्रभू रामाची भूमिका करणारे अरुण गोविल,माता सिताची भूमिका करणारी दीपिका व लक्ष्मणाच्या भूमिकेला मूर्तरूप देणारे सुनील लहरी यांची उपस्थिती राहणार आहे.विशेष म्हणजे शोभयात्रेनंतर बुधवारी रात्री 9 वाजता चांदा क्लब ग्राउंड येथे काष्ठ पूजन व शोभायात्रा समितीचे अध्यक्ष नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्या भक्तीगीतात तल्लीन होऊन प्रभू श्री रामाची आराधना केली जाईल,अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून प्रभू श्री राम मंदिर अयोध्या काष्ठपूजन व शोभायात्रा समिती चंद्रपूरने दिली आहे.
=========================

शोभयात्रेत 2100 कलाकारांचे सादरीकरण
देशाच्या अभिमानाचे केंद्र ठरलेल्या अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या उभारणी करिता अत्यावश्यक सागवान मागवले गेले आहे, ही अतिशय अभिमानाची आणि समाजातील श्रीरामभक्तीला उजळवणारी बाब आहे.त्यामुळेच चंद्रपूरहून श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठीचे सागवान काष्ठ हे विधिवत पूजन करून भव्य शोभायात्रेने वाजत गाजत रवाना करण्यात येणार आहे.
ही शोभायात्रा दोन भागात होणार असून दि. 29 मार्च रोजी बल्लारपूर येथे दुपारी 3.30 वाजता काष्ठ पूजन आणि आरती होऊन सायं.4 वा. पहिल्या शोभायात्रेची सुरुवात होईल. येथे राम लक्ष्मण नावाचे दोन प्राचिन वृक्ष आहेत. त्यांचा घेर देशातच नव्हे तर बहुदा आशियातील सर्व वृक्षात सर्वात मोठा आहे. या वृक्षांचे पूजन यावेळी करण्यात येईल.
ही शोभायात्रा सायं .6 वा. संपेल आणि त्याच वेळी चंद्रपूर येथे महाकाली मंदिरातून दुसरी शोभायात्रा सुरू होईल. चंद्रपूर येथील शोभायात्रा रात्रौ 9 पर्यंत चालेल.या शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध लोककलांचे मनोहरी सादरीकरण करण्यात येणार असून, एकूण 43 प्रकारच्या लोककला, रणवाद्य, योग मल्लखांब, दिंडी, लेझीम, आदिवासी कलाप्रकार, ढोलपथके, ध्वजपथके यांचे सादरीकरण या शोभायात्रेत करण्य़ात येणार आहे. यात कोकणातील दशावतार पासून गणगौर, तारपा, असे सर्वदूरचे कलाप्रकार असतील.स्थानिक एक हजार तर महाराष्ट्रभरातून 1100 असे एकूण 2100 कलाकार हे सादरीकरण करणार आहेत.एक भारत श्रेष्ठ  भारत या संकल्पनेवार आधारित विविध सादरीकरणे भारतभरातून विविध प्रांतातून आलेले कलाकार करणार आहेत.
शोभायात्रेत पूजन केलेल्या काष्ठांवर घराघरातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. शोभायात्रा मार्ग रंगोळ्यांनी सजविण्य़ात येणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूनीं गुढ्या तोरणे उभारण्यात येणार आहेत. या शोभायात्रेत दिल्लीतील कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक संचलनात पारितोषिक प्राप्त महाराष्ट्राचा “नारीशक्ती – साडॆतीन शक्तीपिठे” हा चित्ररथ आणि उत्तर प्रदेशचा प्रजासत्ताक दिन संचलनातील चित्ररथही सहभागी होणार आहे.
=======≠================

शोभायात्रेनंतर रात्री 10 ते 12 या वेळेत कैलास खेर यांच्या गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्य़ात आला आहे. या कार्यक्रमात श्रीरामभक्तीची विविध गीते सादर करण्यात येतील.
श्री श्री रविशंकर व स्वामी रामदेव बाबांनाही निमंत्रण
==========================
प्रभू श्री राम मंदिर अयोध्या काष्ठपूजन व शोभायात्रेचे अध्यक्ष नामदार सुधीर यांनी योगगुरू स्वामी रामदेव बाबा तसेच सद्गुरू श्री जग्गी वासुदेव आणि श्रीश्री रवीशंकर यांनाही सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात आले आहे.
या काष्ठपूजन सोहोळ्याच्या निमित्ताने चंद्रपुरातील घरोघरी दहा हजार श्रीराम जपाच्या वह्या वाटल्या असून एक कोटी श्रीरामनाम जपाचा संकल्प करण्यात आला आहे.देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या पुनरूभारणीत अनेकांचे हात लागले आहे आहेत. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडून प्रभू श्रीराम ही काष्ठार्पण सेवा करवून घेत आहे, अशी  भावना ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.या ऐतिहासिक क्षणाचे सर्व नागरिकांनी साक्षिदार व्हावे, काष्ठ पूजनात सहभाग घेऊन श्रीरामजन्मभूमी मंदिर उभारणीत आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहनही ना.श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here