=================
====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793
=================
काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने सन 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने राज्य शासनाने विषयांची वर्गवारी करीत यात जनहीताचे 5 अमृत या कल्पनेतून अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातील पहिले अमृत म्हणजे शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी, दुसरे म्हणजे सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास, तिसरे अमृत म्हणजे भरीव भांडवली गुंतवणूक, चौथे म्हणजे रोजगार निर्मिती-कौशल्यक्षम युवा आणि पाचवे अमृत म्हणजे पर्यावरणपूरक विकास असे आहे.असे असले तरी अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.त्यामुळे अर्थसंकल्प समजून घेणे ही काळाची गरज आहे.त्या अनुषंगाने सोमवारी 27 मार्चला प्रियदर्शिनी नाट्य सभागृहात सायंकाळी 6 वाजता कॅबिनेट व पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार अर्थसंकल्पाचे विश्लेषण करून जनतेशी संवाद साधणार आहेत.या नंतर लगेचच भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयीं यांच्या जीवनावर आधारित राष्ट्रपुरुष अटल हे महानाट्य सादर केले जाणार आहे.यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची उपस्थिती राहणार आहे,अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून महानगर भाजपाने दिली आहे.कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी महानगर,चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महामंत्री सुभाष कासंगोट्टुवार,रवींद्र गुरनुले,ब्रिजभूषण पाझारे ,विशाल निंबाळकर,संदीप आगलावे,धनराज कोवे आदींनी केले आहे.