* बैलबंडी चालवत आमदार किशोर जोरगेवार यांनी केले शंकरपटाचे उद्घाटन *

0
53

=====================

 * पिपरी येथे शंकरपटाचे आयोजन, *

=====================

पिपरी येथील गावकऱ्यांच्या वतीने आयोजित शंकरपटाचे बैलबंडी चालवत आमदार किशोर जोरगेवार यांनी उद्घाटन केले. यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधारकर अडबाले, पिपरीच्या संरपच वैशाली मातणे, उपसरपंच हरीओम पोटवडे, यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक विश्वजित शाहा, विठ्ठल पिंपळकर, रंगराव पाटील, चंदु मातणे ग्रामपंचायत सदस्य ज्योती पिंपळकर, वर्षा निब्रड, सुनिता मत्ते, माया मुसळे आदींची उपस्थिती होती.

===÷÷============

पिपरी.  येथे गावकऱ्यांच्या वतीने शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्याभरातील शेतकरी आपल्या बैलबंडीसह सहभागी झाले होते. पिपरी येथील हे दुसरे आयोजन असुन शंकरपट पाहण्यासाठी गावकऱ्यांनीही मोठी गर्दी केली होती.

=÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷=÷÷÷=

दरम्यान आमदार किशोर जोरगेवार आणि शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते या शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, शहरी भागासह ग्रामीण भागाच्या विकासावर आमचा भर आहे. मोठा निधी आपण या भागाच्या विकासासाठी उपलब्ध करुन दिला. या भागातील पाणी प्रश्न सुटावा, गावकऱ्यांच्या शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी धानोरा बॅरेज तयार करण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. जवळपास 500 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असणार असुन याचा डिपीआर मंजूर झाला आहे. सदर विकास कामांसोबतच अलीकडच्या काळात लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या मातीच्या खेळांना पुनर्जीवित करण्यासाठी आपण माता महाकाली क्रिडा महोत्सवाचे आयोजन केले होते. यात जवळपास 5 हजार खेळाडूंनी सहभाग घेतला. या महोत्सवात विविध 10 ठिकाणी 21 खेळ खेळल्या गेले दरवर्षी आपण आता हे आयोजन करणार असुन पूढच्या वर्षी शंकरपट हा खेळ सुध्दा या क्रीडा महोत्वसातसहभागी व्हावा यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न करावे असे ते यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

÷÷÷÷÷=÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

ग्रामीण भागात बैलाच्या मालकांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाते. बैलाच्या आक्रमक स्वभावाचा अन्यत्र उपयोग व्हावा, या हेतूने आधी बैलगाडी अस्तित्वात आली. बैलाची मालकी आणि देखभाल करणं हा आजही अभिमानाची गोष्ट मानली जात जाते. असे ते यावेळी म्हणाले. शंकरपट पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

=====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here