रेशन कार्डवरील धान्य वितरणाच्या संदर्भातील नागरिकांच्या समस्यांबाबत आम आदमी पक्षाचे तहसिलदारांना निवेदन*.

0
45

=====================

  * बल्लारपूर *

====================
शहरातील सामान्य नागरिकांना सरकारी राशन दुकानात धान्य वितरणाच्या संदर्भात अनेक समस्या उद्भवत आहेत व या समस्यांबाबत आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात तहसीलदार स्नेहल रहाटे यांना निवेदन सादर केले. या निवेदनाच्या माध्यमातून पक्षाने
अंत्योदय, BPL, APL राशन कार्ड धारकांचे सर्वे करण्याची मागणी केली. तसेच सरकारी राशन दुकान कोणत्या व्यक्तीच्या नावाने आहेत? कौन चालवतात? एक व्यक्ती एकापेक्षा अधिक सरकारी राशन दुकाने कसे चालवतात? अंत्योदय, BPL आणि APL राशन कार्ड धारकांना मासिक राशन देताना नियमित पावती का देण्यात येत नाही? अशी अनेक प्रश्ने सामान्य जनतेद्वारे उपस्थित केली जात आहेत , अशी माहिती तहसीलदारांना दिली. याशिवाय पक्षाला मिळालेल्या जनतेच्या तक्रारीनुसार ग्राहकांना कमी राशन देऊन ऑनलाइन जास्त प्रस्तुत करण्याचे काम होत आहे व सामान्य जनतेची फसवणूक करून अवैद्य राशन विक्री केली जात असल्याची माहिती आहे तसेच काही सरकारी राशन दुकांदाराची जनतेशी वागणूक बरोबर नाही याकडेही तहसीलदारांना लक्ष घालण्यास सांगितले व याविषयीची संपूर्ण माहिती गोळा करून दुकानदारांशी तात्काळ बैठक घेऊन याबाबतीत सुधारणा करून घ्यावी अशी विनंती देखील केली.याशिवाय शहराध्यक्ष पुप्पलवार यांनी राशन कार्डच्या सर्वेसाठी पक्षातर्फे प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी देखील दर्शविली. यावेळेस शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, सचिव ज्योतीताई बाबरे, कोषाध्यक्ष आसिफ हुसेन शेख, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी , युथ अध्यक्ष सागर कांमळे, सचिव रोहित जंगमवार,संगठक अलिना शेख, CYSS उपाध्यक्ष आशिष गेडाम, सुधाकर गेडाम, सचिन मत्ते इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here