* आयपीएल सट्टाकिंग वर कारवाई करा सामाजिक समता संघर्ष समिती *

0
111

=========================

चंद्रपूर-आयपीएल सुरू झाल्यापासून चंद्रपूर शहरात कोट्यवधी चा सट्टा खुलेआम चालतो आहे,मात्र पोलीस प्रशासन सट्टाकिंग ला पाठीशी घालत असल्याने तरुण पिढी गारद होण्याच्या मार्गावर लागली आहे. सदर सट्टाकिंगवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहम्मद इरफान शेख यांनी केली आहे.
पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना सादर केलेल्या निवेदनात शेख यांनी 2016 पासून शहरात सुरू असलेल्या आयपीएल सट्टा याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
चंद्रपूर शहरात राजू नामक सट्टाकिंग या बाजाराचा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट आहे. मात्र पोलिसांच्या आशीर्वादाने त्याचे पर्यंत पोलीस पोहचत नसल्याने चित्र आहे. आता आयपीएल सुरू झाले असून दररोज लाखोंचा सट्टा चालतो.सट्टाकिंग राजू तरुणांना हेरून त्यांना पैशाचे आमिष दाखवितो व सट्टा खेळण्यास बाध्य करतो.यासाठी शाळकरी मुलांचाही वापर केला जातो.या मुलांना कमिशन दिले जाते.त्यामुळे तरुण व शाळकरी मुले यात बरबाद होत आहेत.
शहरात राजूसह इतर 32 जणांचे हे नेटवर्क असून ते सर्व शहरभर फिरुन सावज टिपत असतात. काही तरुण यात हरल्यानंतर त्यांचे कडून पैसे वसूल करण्यासाठी पालकांना धमकी दिली जाते व त्यानंतर घरघुती प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेण्यापर्यंत या सट्टाकिंगची मजल गेली आहे.
सदर सट्टाकिंगचे तेलंगणा पर्यंत नेटवर्क असल्याची माहिती आहे. पोलीस सुध्या याबाबत जाणून आहेत,मात्र महिन्याकाठी कमीतकमी 70 लाखाची उलाढाल पोलीस व संबंधित यंत्रणेवर खर्च केली जात असल्याची माहिती या व्यवसायात कार्यरत असलेले खुलेआम देऊ लागले आहेत व त्यामुळेच पोलीस प्रशासन या सट्टाकिंग वर कारवाई करण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे.
सदर राजू नामक सट्टाकिंगवर गुन्हे दाखल आहेत. तरीही तो केवळ पोलिसांच्या आशीर्वादाने आपले साम्राज्य पसरवीत आहे. शहरात.

=====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here