* दंतेवाडातील शाहिदांना भाजपा व माजी सैनिकांनी वाहिली श्रद्धांजली *

0
29

_________________________

काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला झाला.यात 11 जवान शहीद झाले.नक्षलवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा भारतीय जनता पार्टी महानगर व सेवा निवृत्त सैनिक संघटनेने तीव्र शब्दात निषेध केला असून या हल्ल्यात शाहिद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.जटपुरा गेट येथे आयोजित या कार्यक्रमात  प्रामुख्याने भाजपा जिल्हाध्यक्ष,(श)डॉ मंगेश गुलवाडे,सेवा निवृत्त सैनिक संघटनेचे अध्यक्ष हरीश गाडे, भाजपा नेते ब्रिजभूषण पाझारे, रवी गुरनुले, धनराज कोवे,धम्मप्रकाश भस्मे,रवी लोणकर,दिनकर सोमलकर,विठ्ठल डुकरे,संजय निखारे, वर्षा सोमलकर,मनीशा  महातो, सौ रेणूताई घोडेस्वार, किशोर आत्राम,संजय चीलके, रमेश जिवतोडे, कार्तिक सीडम, विजय मोगरे, नंदकिशोर बरलावार, रमेश जीवतोडे, किशोर आत्राम ,संजय चिलके संजय निखारे, रवी लोणकर यांची उपस्थिती होती.
डॉ.गुलवाडे म्हणाले,दंतेवाडा येथील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दल (DRG) दलाच्या वाहनावर आयईडी हल्ला झाला. शहीद जवानांमध्ये 10 DRG सैनिक आणि एका ड्रायव्हरचा समावेश होता. डीआरजी जवान ऑपरेशनवर गेले होते. तेथून परतत असताना नक्षलवाद्यांनी हल्ला केला.सैनिकांचे मनोबल कमी व्हावे म्हणून असे दुष्कृत्य केले जाते.असे असले तरी आमचे सैनिक देशासाठी प्राणांची आहुती देतात.ते आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहो.सर्व देशवासीयांनी शाहिदांचा सन्मान केला पाहिजे.असे ते म्हणाले.यावेळी काही वेळ मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
_____________________
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
_____________________
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here