* डीएनआर मधून दुचाकीचे पार्सल पाठविणे सुरूच _प्रशासनाचे दुर्लक्ष *

0
50

* चंद्रपूर.* 

******************

बस, ट्रॅव्हल्समधून दुचाकी तसेच पेट्रोल, डिझेलच्या वाहनांचे पार्सल पाठविण्यावर राज्यात बंदी असतानाही चंद्रपूर येथील डीएनआर ट्रॅव्हल्सच्या डिक्कीतून सर्रासपणे दुचाकीची पार्सल पाठविली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकारामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराकडे आरटीओ विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मागील काही महिन्यांमध्ये ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याच्या घटना राज्यात घडल्या. या घटनांमध्ये ज्या पेट्रोलच्या दुचाकी मोटारसायकल गाड्यांची पार्सल वाहतूक केली जाते. त्यातील पेट्रोलमुळे आग आगून बस जळून होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले.
त्यानंतर बस, ट्रॅव्हल्समधून दुचाकीची पार्सल सेवा बंद करण्यात आल्या. मात्र, चंद्रपूर शहरातील डीएनआर ट्रॅव्हल्स च्या डिक्कीमध्ये खुलेआम दुचाकी वाहनांचे पार्सल पाठविण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे भविष्यात प्रवाशांच्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्नही वैद्य यांनी उपस्थित केला आहे.

************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

*************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here