*महा.साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद जिल्हा चंद्रपूर तर्फे प्रेस स्वत्रंता दिवस उत्साहात साजरा !*

0
33

————————-

*तथा सत्कार समारंभ २०२३*  

***********************

* Nilesh Thakre *  

***********************

चंद्रपुर – जागतीक पत्रकार दिन ३ मे ला संपुर्ण विश्वामध्ये साजरा करण्यात येत असून हा दिवस पत्रकारासाठी फार महत्त्वाचा आहे. जागतीक पत्रकार स्वतंत्रता दिन ३ मे २०२३ दिवसाचा चंद्रपुर जिल्ह्यातिल अनेक लाेकप्रिय दैनिक वृत्तपत्रांना तसेच प्रिंट मिडियाला याचा विसर पडला. परंतु महा.साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद जिल्हा चंद्रपूरच्या वतीने विश्व प्रेस स्वतंत्रता दिवस पत्रकार बांधवांचा उपस्थित मृणालगीरी सभागृह बँरिस्टर राजाभाऊ खाेबरागडे चाेैक येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लेखक, प्रख्यात विचारवंत डॉ.प्रा.ईसादास भडके सर हाेते. कार्यक्रमाचे उदघाटक म्हनुन जेष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक बहुजन ललकारचे संपादक मा.श्री.डी.के.आरीकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. मंचावर मुख्य अतिथी म्हनुन दैनिक चंद्रपुर समाचार चे संपादक चंद्रगुप्त रायपुरे,
मा.श्री.मोरेश्वर बारसागडे, माजी प्राचार्य जि.प.ज्युबलि ज्यु.कॉ.चंद्रपूर तथा मा. श्री.प्रा.मनोज भैसारे, साहित्यीक विचारवंत चंद्रपूर प्रामुख्याने उपस्थित हाेते. या कार्यक्रमात कलम मागे इंसाफ चे संपादक रमजान अली हे विशेष पाहुणे म्हनुन मंचावर हाेते. तसेच पत्रकार आक्केवार यांची ही खास उपस्थिती हाेती. कार्रक्रमाचे स्वागत अध्यक्ष राष्ट्रीय पुराेगामी पत्रकर संघाचे राज्य सचिव तथा दैनिक कळंब नगरीचे उप संपादक मा.निलेश ठाकरे यांनी सर्व पाहुण्याचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला बारसागडे सरांनी आपल्या भाषनातुन पत्रकारीतेला ईतिहास व आजच्या दिवशी चे महत्व पटवुन दिले. डि.के.आरिकर सरांनी विद्यमान परिस्थितीचा आढावा घेत आपले मनाेगत व्यक्त करतांना अनेक विषयावर उपस्थितांचे लक्ष केंद्रित केले.चंद्रगुप्त रायपुरे यांनी आजच्या कार्यक्रमाचा आम्हाला ही विसर पडले असतांना गाेपी गाेविंद मित्र हे मात्र आवर्जुन आठवन ठेवुन कार्यक्रम राबवतात म्हनुन आयाेजकांनांचे त्यांनी आभार मानले. सय्यद रमजान अली यांनी आक्रमक स्वरूपात भाषण करित पत्रकारांच्या अनेक समस्यांवर व त्यांना हाेणारा त्रास यावर प्रकाश टाकला. भैसारे सरांनी सुध्दा आपले उत्कुष्ठ भाषण करित सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वागत अध्यक्ष म्हुनन निलेश ठाकरे यांनी आपल्या भाषणातुन सर्व पत्रकारांना संबाेधित करतांना डाेळ्यापुढे असणारे मुद्देशिर बातम्या लावुन शासन प्रशासनाचा भ्रष्ट्राचार हा जनते समाेर उघडीस आनायला पाहीजे या करिता आव्हान केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ.प्रा.ईसादास भडके यांनी न विसरता कार्यक्रम राबवणारे गाेपी मित्र व त्यांचा चमु ची प्रशंसा करित येणार्या दिवसात गाेपी मित्रा यांचा सन्मान व सत्कार व्हायला हवे व ते आम्ही करू अशी कार्यक्रमा प्रसंगी घाेषना केली. या वेळेस जेष्ठ पत्रकार पाेतनवार सरांचा तसेच ईतर मान्यवरांचा ही शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन आजाेजक गाेपी गाेविद मित्रा यांनी करित आपला वेगळा ठसा उमटवला. हा सर्व कार्यक्रम यशश्वी करण्याकरिता आयाेजक श्री.गाेपी गोविंद मित्रा, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष म.सा. ग्रा.पत्रकार परिषद तसेच राष्ट्रवार्ता चे संपादक सचिन बोबडे, हैलाे चांदा न्युजचे संपादक शशि ठक्कर, राहुल बहादे, धनराज काेवे,यांनी परिश्रम घेतले. मान्यवरांचे तसेच उपस्थित पत्रकारांचे आभार जयप्रकाश कांबडे यांनी मानले.

***********************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here