*मनपा आयुक्तांचे आदेश वृत्त पत्राच्या बातमी पुरतेच*

0
29

————————— 

* नीलेश ठाकरे * 

*****************

चंद्रपुर महानगरात अनेक समस्या असुन ही महानगरपालिकेच्या वतीने त्याचे निवारण हाेत नाही अश्या बर्याच तक्रारी नागरीकांनकडुन ऑनलाईन, ऑफलाईन राेज चंद्रपुर मनपाच्या कार्यालयात येत असुन सुध्दा त्याकडे मनपा आयुक्त, सहआयुक्त, अधिकारी, कर्मचारी साधी दखल सुध्दा घेत नसतात. म्हनुन दिवसेन दिवस मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांच्या कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण केल्या जात आहे. चंद्रपुर महानगरात अतिक्रमाण सर्वत्र माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात मनपाची कुठली ही परवानगी न घेता अवैध बांधकाम तर जाेमात सुरू दिसुन येताे. नगर रचना विभागा कडुन तर नियमाची पायमपल्ली करून काही बिल्डर, इंजिनियर, बांधकाम व्यवसाईक तथा घर बांधकाम करणार्यांना कागद पत्राची पुर्तता न करताच बांधकाम परवानगी देत आहेत. ज्या भागाला मनपाच्या वतीने ब्लु झाेन घाेषित केल्या गेले. त्याच परिसरात अवैध कामाचा सेैर सपाटा राेज सुरू आहे. ते ही शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस बघुन अवैध बांधकाम करणारे घराचे स्लाप टाकतांना दिसुन येतात. नदीकाठालगत ले-आऊट धारक पुरग्रस्त भागात ले आऊट टाकुन प्लाट धारकांना पाण्यात असणारे नॉन ड्रायेव्हशन प्लाट एक हजाराच्या वर असलेल्या किंमतीत विकत आहेत. यात टाऊन प्लांंनीग अधिकारी तथा मनपाचे अतिक्रमाण अधिकारी आधंळ्याची व बघ्याची भुमिका बजावतांना दिसत आहेत. या बाबत एका मनपा अधिकारी यांना विचारल्यास मनपात सध्या कमी कर्मचारी असल्याचा अभाव असल्याचे त्यांचाकडुन बाेलले जातेे. एकीकडे कर्मचारी संख्याबळ कमी असल्याचे सांगण्यात येते तर दुसरीकडे नुकतेच काही दिवसा पुर्वी आयुक्त विपिन पालिवाल यांनी सफाई कर्मचारी यांना अचानक पणे कमी केले. *ह्या सर्व बाबीचे विषयाला घेवुन चार पाच दिवसा पुर्वी मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांनी तातळीची बैठक घेवुन याेग्य ती कारवाही करण्याचे आदेश दिले व या आदेशाचे पालन करून याेग्य ती कारवाही करा असे सह आयुक्त, अधिकारी, नगर रचना येथिल अधिकार्यांना सांगण्यात आले* पण ते प्रशासनाच्या तर्फे वृत्त पत्रात बातमी देण्यापुरतेच ठरले आहे. अजुन पर्यंत तरी कुठल्याच कारवाहीचा उजाळा न निघाल्याचे स्पष्ट चित्र दिसुन येत आहे. मनपाच्या या तातळीच्या बैठकीत सर्व झाेन आयुक्त, अधिकारी, नगर रचना येथिल अधिकरी उपस्थित हाेते. “लबाड लांडग ढाेंग करतय की साेंग करतय” असे गाण्याचे बाेल मनपाच्या अधिकार्यांन बद्दल जनतेत सुर ऐकण्यास ऐकु येत आहे. या कडे आता मा. जिल्हाधिकारी यांनी स्वताहुन लक्ष देणे मात्र फार गरजेचे आहे. नाही तर चंद्रपुर महानगरातला विकास हा मुख्य रसत्यापुरताच असेल व आंतर भागात चंद्रपुर मनपाचे माजी महापाैर, सभापती तसेच मनपा आयुक्त, सह आयुक्त अधिकारी यांचे फाेकळ आश्वासन म्हनायला कुनाची ही हरकत नसावी हे विशेष.

**********************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here