* महिला आणि बालकांना केंद्रस्थानी ठेवून विविध १२ ठिकाणी आरोग्य शिबिराच्या आयोजनाचे उत्तम नियोजन करा, – आ. किशोर जोरगेवार *

0
37

*********************

* मनपा अधिका-यांसोबत बैठकआरोग्य शिबिराच्या माध्यमातुन नागरिकांना हेल्थ कार्ड उपलब्ध करा *

 ************************

नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देणे आपली जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने राज्य स्तरावरुन 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत प्राथमिक आरोग्य संस्थाना सक्षम करुन गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहाणा-या नागरिकांना उत्कृष्ट व दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ देण्याकरीता मनपा अंतर्गत  सुरु करण्यात आलेल्या १२  आरोग्यवर्धिनी केंद्र व मनपाच्या 7 आरोग्य केंद्र अशा १९ केंद्रांपैकी १२ ठिकाणी  महिला आणि लहान बालके यांना केंद्रस्थानी ठेवून  आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे उत्तम व सूक्ष्म  नियोजन करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना दिल्या आहे.
आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या प्रसंगी सदर सुचना केल्या आहे. महानगरपालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरिकर, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी गर्गेलवार, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवा नेते अमोल शेंडे, आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक विश्वजीत शाहा, करणसिंह बैस, आनंद रणशूर, किशोर बोलमवार, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे, अल्पसंख्याक विभागाच्या महिला शहर संघटिका कौसर खान, आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, आरोग्याच्या क्षेत्रात मनपा प्रशासनाने आणखी उत्तम काम करण्याची गरज आहे. आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून आपण नागरिकांच्या दारा पर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली  आहे.उत्तम आरोग्य सेवा हा नागरिकांचा अधिकार आहे.  त्यामुळे मोठी झाली असलेल्या आपल्या आरोग्य यंत्रणेचा योग्य उपयोग करत नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. आपले 12 पैकी 10 आरोग्यवर्धिनी केंद्र सक्रियरित्या कार्यरत झाले आहे. तर 7 आरोग्य केंद्राच्या माध्यमातुन आपण आरोग्य सेवा देत आहोत. असे असले तरी येथे आरोग्य सेवा देत असतांना काही मर्यादा आहेत. येथे उपकरणांची कमी आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य तपासणी येथे आपण करत आहोत. मात्र आता यात बदल करण्याची गरज आहे. मनपा तर्फे सध्या स्थितीत सुरु असलेल्या 10 आरोग्यवर्धिनी केंद्र आणि 7 आरोग्य केंद्र अशा 17 ठिकाणांपैकी नागरिकांच्या सोयीचे  १२  ठिकाण निवडून येथे  आपल्याला नियमित आरोग्य शिबिरांचे आयोजन करायचे आहे. गरज असल्यास या आरोग्य शिबिरामध्ये नागपूर, मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांना बोलविण्याची आपली तयारी असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले.
आयोजित होणार असलेल्या या आरोग्य शिबिरात नागरिकांना असलेले आजार आणि त्यांना भविष्यात एखादा आजार होणार असल्याची शक्यता बाबत तपासणी करुन एक प्रकारे त्यांना हेल्थ कार्ड उपलब्ध करुन दिल्या जावे. यासाठी मॅमोग्राफी मशीन, स्त्री आजारा बाबतची सर्व संसाधने या शिबिरासाठी आपण उपलब्ध करुन देणार असल्याचे ते या बैठकीत म्हणाले. या शिबिरासाठी आयएमए च्या डॉक्टरांसह आवश्यक सर्व संस्थांशी संपर्क साधून एक संयुक्त बैठक लावण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांना दिल्या आहे. या बैठकीला मनपाच्या संबंधित अधिका-यांची उपस्थिती होती.

****************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

****************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here