* स्व. राजीवजी गांधी हे माहिती व तंत्रज्ञान युगाचे जनक होते *

0
33

***********************

   * सोहेल रजा शेख *

***************************
चंद्रपूर(का.प्र.) भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी हे माहिती व तंत्रज्ञान युगाचे जनक होते.राजीवजीच्या काळात भारत देश यशाच्या शिखरावर पोहोचला होता.असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग चे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख यांनी केले. आकाशवाणी चंद्रपूर समोरील कॉम्प्लेक्स मधील अल्पसंख्यांक विभाग च्या कार्यालयात स्व.राजीवजी गांधी यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग चे प्रदेश उपाध्यक्ष
सय्यद रमजान अली प्रामुख्याने उपस्थित होते
सय्यद रमजान अली म्हणाले की,स्व.इंदिराजी गांधी यांची हत्या झाल्यानंतर अतिशय कमी वयात देशाची धुरा सांभाळण्याची वेळ त्यांच्या खांद्यावर आली.अश्या बिकट परिस्थितीतही राजीवजी गांधी यांनी दूरदृष्टी ठेऊन देशाला प्रगतशील राष्ट्राच्या यादीत बसविले.देशात माहिती व तंत्रज्ञान बरोबर हरित क्रांती सुद्धा घडवून आणली,त्याच बरोबर अठरा वर्षाचा युवकांना मतदाना अधिकार सुद्धा राजीवजी गांधी यांनी दिला.भारत देशात औद्योगिक क्रांती सुद्धा घडवून आणली आणि देशातील नागरिकांना रोजगार प्राप्त करवून दिला,असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
विनम्र अभिवादन च्या या कार्यक्रमात सर्वप्रथम भारतरत्न स्व.राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून समस्त उपस्थितां कडून आदरांजली वाहण्यात आली
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपुर शहर कांग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग चे अध्यक्ष ताजुद्दिन शेख यांनी केले.
या कार्यक्रमात चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभाग शहर अध्यक्ष ॲड. रुबिना मिर्झा,अल्पसंख्यांक विभाग च्या नूरी खान, आतिफ रजा,शहबाज शेख सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती*.

******************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

********************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here