* कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट वीज मोफत द्या – आ. किशोर जोरगेवार *

0
52

—-‐————————

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेत केली मागणी * 

————————————–

कर्नाटकमध्ये नव्याने स्थापीत झालेल्या कर्नाटक सरकारने राज्यात 200 युनिट विज मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट विज मोफत देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई मंत्रालयात भेट घेत केली आहे.
नवीन महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने शिंदे – फडणवीस सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या लोकोपयोगी हिताचे निर्णय धडाडीने घेत आहे. यात महिलांच्या प्रगतीच्या दृष्टीने राज्य परिवहन बसेस मध्ये महिलांना प्रवासात ५० टक्के सरसकट सवलत, शेतकर्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, मुलींसाठी लेक लाडकी योजना, रुग्णांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत 5 लाख रुपये मदत, यासह अनेक नागरिकांच्या हिताच्या योजना महाराष्ट्र सरकार राबवीत आहे.
महाराष्ट्र राज्य हे विकासाच्या मार्गावर असले तरी येथे अनेक गोरगरीब आजही मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे. आजच्या काळात वीज ही अत्यावश्यक सेवेत असून प्रत्येक कुटुंबाला वीज देण्यासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. सरकार गरजु नागरिकांना मोफत अन्न, वस्त्र व निवारा देत आहे. त्यात आता प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाला किमान २०० युनिट वीज मोफत देण्याची गरज असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नवनिर्वाचित कर्नाटक राज्य शासनाने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत  राज्यात 200 युनिट विज मोफत देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. मागील काही वर्षात भारतातील दिल्ली, पंजाब, उत्तराखंड राज्याच्या पाठोपाट कर्नाटक राज्यानेही 200 युनिट विज मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर आता आर्थिक सक्षम असलेल्या महाराष्ट्र राज्यानेही राज्यातील प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट विज मोफत द्यावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातुन आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

————————————–

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

***********************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here