*गडचिराेली जिल्ह्यातिल पाेलिस भरतीत नामसदृश्याचा फायदा घेत गैरप्रकार झाल्याचा आराेप !*

0
137

***********************

*गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरतीमध्ये झाडे कुणबी (ओबीसी )या प्रवर्गातील मुलांनी नामसदृश्याचा फायदा घेऊन भटक्या जमाती क (एनटी – सी )या प्रवर्गात निवड करून घेतल्याची बाब समोर आली आहे.*

**************************

*मागील गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये झाडे भटक्या जमाती क प्रवर्गातून निवड झालेली आहे. तरी याबाबत विस्तार चौकशी करून संबंधित व्यक्तींवर उचित कार्यवाही करण्यात यावी याकरिता आज जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली यांची मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी भेट घेतली.*

***************************

*गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा,गडचिरोली, चामोर्शी मुलचेरा, अहेरी,भामरागड इत्यादी व चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, मुल व गोंडपिंपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाडे कुणबी जातीचे लोक राहत असून त्यांची जात इतर मागास प्रवर्गात मोडते.*

*****************************

*परंतु झाडे कुणबी या जातीतील कुणबी हा शब्द वगळून धनगर व तत्सम जातीतील अनुक्रमांक 15 वरील झाडे या पोट जातीचा आधार घेऊन स्वतःला भटक्या जमाती क या प्रवर्गातील असल्याचे दाखवून बोगस झाडे जातीचे जात प्रमाणपत्र काही जणांनी मिळविल्याची बाब पुढे आली आहे.*
*बोगस जात प्रमाणपत्राचे आधारे भटक्या जमाती क च्या आरक्षित जागेवर शासकीय नोकरीवर कब्जा करून बोगस जातीचे पुरावे सादर केले व गैर मार्गाने चंद्रपूर जात पडताळणी कार्यालयाकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळविले आहे.*

********************************

*त्यामुळे धनगर व तत्सम पोट जातीतील भटक्या जमातीचे उमेदवारांवर अन्याय होत आहे.झाडे कुणबी हे भंडारा,चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात वास्तव्यास आहे परंतु जात प्रमाणपत्र देताना उपजातीच्या नावाने जात प्रमाणपत्र न देता कुणबी ओबीसी म्हणून दिले जातात.झाडे कुणबी हे धनगराचे पोट जातीतील झाडे या नावाचा नाम सदृश्याचा फायदा घेण्याच्या उद्देशाने गैरमार्गाचा वापर करीत आहे.*

**************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here