*विजय सूर्यवंशी यांच्या जन्मदिवस गौवर समारंभाने साजरा!*

0
27

******************************* 

* Nilesh Thakre  * 

*************************

चंद्रपूर- राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांचा जन्मदिन चंद्रपूरात आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.या प्रसंगी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, साहित्यिक,सांस्कृतिक,वैद्यकीय तसेच पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांचा शाल व सन्मानचिन्ह भेट देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य सचिव निलेश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उत्घाटन प्रसिद्ध साहित्यिक डॉ.इसादास भडके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर हे मंचावर उपस्थीत हाेते. सन्मान व सत्कार मान्यवर म्हनुन सद्या राज्यभर गाजत असलेल्या ” ते पन्नास दिवस ” कादंबरीचे लेखक पवन भगत, रिपब्लिकन चळवळीचे अभ्यासक प्रशिक आनंद, कोरोना काळात अनेकांना मोफत जीवदान देणारे डॉ.साहस बेंडले, भीम आर्मीचे युवा चंद्रपुर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रायपूरे, वंचित आघाडीच्या चंद्रपूर महानगर अध्यक्षा तनुजा रायपूरे, शासकिय प्रेस फोटो ग्राफर गोलू बाराहाते या सर्व मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
समाजिक जबाबदारी सांभाळत समाजाला आपण काही देणे लागतो ही भूमिका घेऊन सदैव जनतेच्या सेवेत असणाऱ्या मंचावरील मान्यवरांचा शाल व सन्मांचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कराटे स्पर्धेत आंतराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवलेल्या स्पर्धकांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. मुलांनी याचे श्रेय मास्टर राहुल बाहादे यांना दिले.
या गौरव करण्यात आलेल्या मान्यवरांनी देशातील लोकशाहीचा चौथा स्थंभ कसा धोक्यात आहे,यावर भाष्य केले. दरम्यान लोकशाही आणी संविधान वाचविण्याची जबाबदारी पुरोगामी विचारांच्या माणसांवर येऊन ठेपल्याचे प्रतिपादन गौरव मूर्तींनी केले. महा.साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद.जि.चंद्रपुर येथिल पत्रकारांनी राष्ट्रीय पुराेगामी पत्रकार संघात आपले विलीकरण करून पुराेगामी पत्रकार संघात स्वताला शामिल करून घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गाेविंद ( गाेपी ) मित्रा, शशी ठक्कर, सचिन बाेबडे, अनिकेत शेंडे यांनी अथक परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन संताेष साखरकर यांनी केले.

*************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

****************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here