* यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भिवापूर येथे निशुल्क ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन *

0
26

****************************

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भिवापूर वार्डातील तेली समाज मंदिर येथे निशुल्क ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, आशु फुलझेले, सायली येरणे, कल्पना शिंदे, आशा देशमुख, माधूरी निवलकर, यांच्यासह स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.

******************************

   यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविल्या जात आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी निशुल्क शिवणकामाचे प्रशिक्षण दिल्या जात आहे. यात महिला मोठ्या संख्येने सहभागी होत असुन शिवणकामचे प्रशिक्षण घेत आहेत.

*********************************

दरम्यान भिवापूर वार्ड येथे ब्युटी पार्लर  प्रशिक्षणाचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. सदर शिबिर हे एक महिना चालणार असून या शिबिरात हेअर स्टाईल, व्हॅक्स, मेनिक्युअर, पेडिक्युअर, हेड मसाज, शॅम्पू, मेहंदी डाय, फेशिअर, प्लकींग, साडीचे प्रकार, मेकअप, हेअर कटींग, पार्टी वेअर मेकअप आदी प्रकारचे प्रशिक्षण महिलांना दिल्या जात आहे

**************************

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here