* मंत्रालय लिपिक आणि कर सहायक यांची टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करा – यंग चांदा ब्रिगेड ची मागणी *

0
17

**************************

* जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन *

 ***************************

मंत्रालय लिपिक आणि कर सहायक पदासाठी 31 मे 2023 ला घेण्यात आलेल्या उमेदवारांना विविध तांत्रिक अडचणी आल्याने त्यांच्या पात्रता होण्याची शक्यता कमी झाली आहे. यात टंकलेखन ची अट विद्यार्थ्यांना अडचणीची ठरत असून सदर अट रद्द करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेड चे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, शहर संघटक करणसिंग बैस, बबलू मेश्राम आदींची उपस्थिती होती.

*******************************

MPSC जाहिरात क्र. 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा; पुर्व परीक्षा, मुख्य परीक्षा दिल्यानंतर मंत्रालय लिपिक आणि कर सहायक यांची पात्रता परीक्षा 7 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली होती. मात्र बहुतेक उमेदवारांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींना तसेच आवाक्याबाहेर परीक्षेची पात्रता ठेवल्यामुळे आयोगाला आवश्यकतेनुसार उमेदवार ठरवता आले नाही. परिणामी, आयोगाने सदर परीक्षा पुर्णतः रद्द करुन अवघ्या 7 दिवस आधी परिपत्रक काढून सदर परीक्षा 31 मे 2023 रोजी पुन्हा घेण्याचे ठरविले मात्र पुन्हा 31 मे ला सदर उमेदवारांना विविध तांत्रिक अडचणी आल्याने त्यांच्या पात्रता होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्याच्या मध्ये विशेषतः मुख्य परीक्षा देताना उमेदवारांकडून मराठी शब्द टाईप चा 30 चा व इंग्रजीसाठी  40 चा वेग चे प्रमाणपत्र  घेण्यात आले मात्र सदर टंकलेखन परीक्षा दरम्यान अधिकच्या शब्द प्रति मिनिट च्या वेगाने चाचणी घेण्यात आली. त्यामुळे उमेदवारांमध्ये सदर चाचणी दरम्यान गोंधळ निर्माण झाला आहे.

*******************************

2019 पर्यंत पुर्व परीक्षा नंतर मुख्य परीक्षा घेऊन मुख्य परीक्षेच्या मार्कांवर अंतिम निकाल लावला जात असे. परंतु या भरती प्रक्रियेत प्रथमच पूर्व परीक्षा नंतर मुख्य परीक्षा व आता टंकलेखन परीक्षा ठेवण्यात आली. यासाठी आत्तापर्यंत दोनदा चाचणी घेण्यात आली मात्र दोन्ही वेळेस उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. तसेच राज्यसेवा परीक्षा 4 दिवसावर असताना तडकाफडकी 7 दिवस आधी सूचना टाकुन परीक्षा घेण्यात आली ज्यात उमेदवारांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे उमेदवारांच्या अपात्रतेची संभाव्यता अधिक आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेतील टंकलेखन कौशल्य चाचणी सरसकट रद्द करुन पुर्वीप्रमाणेच मुख्य परीक्षेच्या मार्कांवर अंतिम निकाल लावून उमेदवारांची निवड करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

*******************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  

*****************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here