*पावसाळल्या पूर्वी नाल्यांची साफ-सफाई करा- जमात- ए-इस्लामी *

0
34

****************************

चंद्रपूर – येऊ घातल्या पावसाळ्यात नागरिकांना होणारी अडचण लक्ष्यत घेता जमात- ए-इस्लामी हिंद, चंद्रपूर शाखे द्वारे  पर्यावरण सप्ताह निमित्त  चंद्रपूर महागरपालिकेचे आयुक्त श्री विपीन पालीवाल यांना नेवादन देऊन शहरातील नाल्या साफ-सफाई करणे, डासांची उत्पत्ती रोकण्या साठी उपाय योजना करण्याची मागणी केली आहे.
**********************************
पर्यावरण सप्ताह दिनांक 05 जून ते 12 जून पावेतो साजरा करण्यात येतो. या निम्मिताने जमात ए इस्लामीच्या द्वारे वृक्षारोपण व रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत  जनजागरण सारखे कार्यक्रम घेण्यात येत आहे.  पावसाळ्यात नागरिकांना होणारी अडचण लक्ष्यत घेता जमातच्या एका शिष्टमंडळाने   चंद्रपूर महागरपालिकेचे आयुक्त  याना भेटून आपल्या विविध मागण्याचे निवेदन सादर केले.
********************************
निवेदनात तुंबलेल्या नाल्या साफ करणे, शहरात जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग साफ करणे व प्लास्टिक पिशव्या व इतर प्लास्टिक बॉटल्स वगैरे हटवून त्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याची  मंगनी करण्यात आली.   शहरात डासांची पुनरुत्पत्ती वातावरण बदलामुळे सुरू झालेली आहे. येत्या काळात ओल्या वातावरणात डास अधिक प्रमाणात उत्पन्न होतील. त्यामुळे डेंगू सारखे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी फगिंगं मशीन द्वारे फवारणी करण्यास सुरुवात करावी, अशी हि मांगणी करण्यात आली.
************************************
            शिष्टमंडळात शहर अध्यक्ष मिर्जा  राहील बेग, मोहम्मद ईकबाल सर, फजले माजिदसर, मिर्झा  मुजफ्फर सर ……. व इतर सदस्य उपस्थित होते.
*********************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*********************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here