* अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही केवळ एक संघटना नाही, तर मानव मुक्तीचा पुरोगामी क्रांतिकारी महाप्रवाह आहे.*

0
34

—————————————
अंनिस बैठकीतून सार्वत्रिक सूर निदादला
—————————————-
अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातीअंत ही दोन्ही लढे एकमेकांना पूरक -रामभाऊ डोंगरे
—————————————-
विशेष बैठकीत अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे वितरण
—————————————

अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही केवळ एक संघटना नाही. तो केवळ एक विचार नाही, “संपूर्ण समाजाला विज्ञानाच्या, विवेक वादाच्या तर्कशीलतेच्या अनुभवातून शिकण्याच्या मार्गावरून घेऊन जाणारा हा मानववंशांच्या विकास करणारा मानवमुक्तीचा पुरोगामी, क्रांतिकारी महाप्रवाह आहे!” हा प्रवाह दिवसेंदिवस अधिक बळकट अधिक लांब-रुंद करण्यासाठी सर्वांनी झटले पाहिजे. ज्यांचे विचार अधिक सखोल, प्रगल्भ बनलेत त्यांनी समाजात अधिक कृतिशील, गतिमान होण्याची गरज आहे. संघटित कार्यकर्ते त्यांचे काम करत आहेतच: पण सर्व पक्ष धर्म,भाषा, विभागातील जाणकारांनी, कलावंतांनी या समाज बदलाच्या कामात अधिक रस दाखविला पाहिजे असा सूर नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भद्रावतीच्या विशेष बैठकीत आयोजित मान्यवरांनी दिला. बैठकी प्रसंगी अध्यक्षस्थानी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे, मार्गदर्शक व सल्लागार रवींद्र तिराणिक, महाराष्ट्र अंनिस तालुकाध्यक्ष डॉ.राहुल साळवे, कार्याध्यक्ष शारदा खोब्रागडे, प्रधान सचिव प्रा. अमोल ठाकरे, श्रीधर भगत, भारत मडावी, रमेश गेडाम, लताताई टिपले, चंद्रकला गेडाम आदींची उपस्थिती होती
जात ही एक अंधश्रद्धा आहे आणि अंधश्रद्धा ही जातीव्यवस्थेच्या विषम चौकटीत आणखी शोषक बनत चालली आहे त्यामुळे जात आणि अंधश्रद्धा या दोन्ही जेव्हा सामाजिक पातळीवर संस्थात्मक स्वरूप घेऊन अधिकाधिक लोकांचे जगण्याचे स्वातंत्र्य हिरावून प्रगतीचे रस्ते बंद करते तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातीअंताचे लढे हे एकमेकांना पूरक बनतात’ असा विचार राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी मांडला.
आज मोठ्या संख्येने मंडळी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात येत आहे, ही बाब अत्यंत अभिनंदनीय आहे. परंतु जातीअंतासाठी असा मोठ्या प्रमाणावर काम करणारा पक्ष विरहित गट निर्माण होणे तेवढेच महत्त्वाचे आहे. असा विचार महाराष्ट्र अंनिस मार्गदर्शक सल्लागार रवींद्र तिरानिक यांनी प्रास्ताविक पर सूत्रसंचालन यातून मांडला . आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष शारदा खोब्रागडे यांनी केले.

***************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

***************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here