घुग्घूस शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचा-यांची वाढ करा – आ. किशोर जोरगेवार

0
25

*************************

घुग्घूस शहरातील समस्यांबाबत विविध विभागाची बैठक

 *************************

घुग्घूस शहरात स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने स्वच्छतेला प्राथमिकता द्या घुग्घूस शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचा-यांची कंत्राटी पध्दतीने भरती करुन कर्मचा-यांच्या संख्येत २५  टक्के वाढ करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे.

****************************

घुग्घूस शहरातील विविध समस्यांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घुस येथील वेकोलीच्या विश्रामगृह येथे विविध विभागाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी घुग्घूस नगर परिषदेचे मुख्य अधिकारी जितेंद्र गादेवार, वेकोलिचे एरिया पर्सनल मॅनेजर  बिनेज कुमार, वेकोली सब एरिया मॅनेजर रेड्डी, वेकोली बांधकाम अभियंता रविंद आर, घुग्घूस मंडळ अधिकारी किशोर नवले, वेकोली पर्सनल मॅनेजर भारत चुक्का, महावितरण उप कार्यकारी अभियंता पेदोर, सहायक अभियंता भटारकर आदी अधिका-यांची उपस्थिती होती.

*****************************

या बैठकीत घुग्घूस येथील स्वच्छेतेवर अधिक भर देण्यात आला. शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचत आहे. या भागांमध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना केल्या. अनेक भागात अंधार असतो त्या भागात नवीन पोल लावून लाईट लावण्यात यावी अशा सुचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरणला केल्या आहे. कोणत्याही विभागाचा अभियंता येथे पूर्ण वेळ कार्यरत नाही. त्यामुळे विकास कामात दिरंगाई होत आहे. यासाठी येथे पुर्ण वेळ अभियंता ठेवण्यात यावा. विद्युत पुरवठा सतत खंडीत होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहे. याकडे महावितरण विभागाने गांभीर्याने लक्ष देत नागरिकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्याच्या सुचना त्यांनी यावेळी महावितरणला केल्या आहे. वेकोलीच्या राजिव रतन रुग्णालय येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी वेकोली प्रशासनाला केल्या आहे. वेकोलीच्या वसाहतीची दुरुस्ती करण्यात यावी, नगर परिषद आणि वेकोली प्रशासनाने आपसात समन्वय साधत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी संयुक्त काम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या आहे.

*******************************

घुग्घूस शहर झपाट्याने वाढत आहे. आता आपण ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर परिषदमध्ये केले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहे. मात्र येथे अपेक्षीत गतीने कामे होत नसल्याच्या तक्रारी आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांना अपेक्षीत असे कामे प्राथमीकतेने करा अशा सुचना त्यांनी यावेळी अधिका-यांना केल्या आहे.  या बैठकीला यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते इमरान खान, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे, सायली येरणे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, स्वप्नील वाढई, राजू सुर्यवंशी, प्रेम गंगाधरे, मुन्ना लोढे, राजू नातर, मयूर कलवल, प्रितम भोंगळे, नागेश तुराणकर, नवीन मोरे, इरशाद शेख, संध्या जगताप, उषा आगदरी, उज्वला उईके, वनिता निहाल आदींची उपस्थिती होती.

********************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

******************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here