***********************
मागील वर्षी प्रमाणेच या वर्षी देखील महानगरपालिका चंद्रपूर च्या वतीने सुंदर माझे उद्यान / ओपन स्पेस ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत शहरातील 60 पेक्षा अधिक संघ सहभागी झाले आहेत. अश्या वेळी जनसेवेसाठी सदैव तयार असणारी योग नृत्य संस्थेने पुढे येऊन शहरातील 11 जागा स्वच्छ करण्या करिता हाती घेतल्या आहेत. कोहिनूर ग्राउंड ला ऐतिहासिक वारसा मिळालेला आहे, परंतु सध्यस्थितीत येथील अवस्था वाईट आहे, किल्ल्याच्या भिंतींवर फार झुडपे झाली असून तेथे सापांचे प्रमाण देखील वाढलेले आहे, मॉर्निंग वॉक ला येणाऱ्या लोकांमध्ये देखील भीती दिसून येते. हा परिसर स्वच्छ करून लोकोपयोगी यावा हीच महानगर पालिका आणि योग नृत्य परीवार यांची मनस्वी इच्छा आहे त्या अनुषंगाने,
योग नृत्य परीवार चे जनक भाईश्री गोपाल जी मुंदडा यांच्या मार्गदर्शनात मुग्धा तरुण खांडे यांनी कोहिनूर ग्राउंड येथे स्वच्छता अभियानास आज पासून सुरुवात केली आहे. मागील स्पर्धेत याच संघांनी एक लक्ष रुपये व पंचवीस लक्ष रुपयांचे विकासकामे अशे प्रथम पारितोषिक मिळविले होते त्यामुळे या वर्षी देखील या संघा कडून अपेक्षा वाढलेल्या आहेत .
गोपाल जी मुंदडा यांनी संघातील सगळ्यांना श्रमदान करून ग्राउंड ची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करण्या करिता उत्साह वाढविला.
संघ प्रमुख मुग्धा खांडे यांनी व यांच्या संपूर्ण टीम ने आज पासून पुढील एक महिना श्रमदान देऊन कोहिनूर ग्राउंड स्वच्छ व सुंदर बनविण्याचा प्रन घेतला.
*****************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
****************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793