पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ७ ऑगस्‍ट रोजी पूरग्रस्तांसोबत बैठक

0
12

नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.६- चंद्रपूर शहरात व आजुबाजूच्‍या परिसरात गेल्‍या काही महिन्‍यांपासून पावसाचा प्रचंड जोर होता. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांच्‍या घरी पाणी शिरले. तसेच अनेक वस्‍त्‍या जलमय झाल्‍या. ज्‍यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही रहिवाश्‍यांना पिण्‍याचे पाणी, अन्‍न, विज या सर्व गोष्‍टींचा तुटवडा जाणवला. अशी परिस्थिती ज्‍या परिसरातील नागरिकांवर उद्भवली त्‍यांना प्रशासनाने शक्‍य ती मदत करण्‍याचा पूर्ण प्रयत्‍न केला. परंतु ज्‍यांना अजुनही कुठलीही मदत मिळालेली नाही किंवा मिळालेली मदत ही कमी आहे, असे वाटते अश्‍या सर्व नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्‍याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार ७ ऑगस्‍ट रोजी दुपारी ४.०० वा. नियोजन भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर येथे प्रत्‍यक्ष भेटणार आहेत व त्‍यांच्‍या समस्‍या ऐकून त्‍यावर उपाययोजना करण्‍याचे निर्देश देणार आहेत. ज्‍या नागरिकांना आपल्‍या समस्‍या घेवून भेटावयाचे आहे त्‍यांनी आपले अर्ज घेवून प्रत्‍यक्ष नियोजन भवन, चंद्रपूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री कार्यालयाने केलेले आहे.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here