*मानवाच्या कल्यानासाठी वृक्षारोपणना बरोबर झाडांचे रक्षण करणे सुद्धा काळाची गरज*

0
33

=================== 

— डी. के. आरीकर चंद्रपूर _  

==================

30 ग्लोबल वार्मिंग मुळे वातावरणात अनेक बदल झाले असून पर्यवारणाला धोका निर्माण झाला आहे. तर प्रदूषणाने सर्व सीमा ओलांडल्या मुळे मानव, पशु पक्षी, जीव, जंतू यावर विपरीत परिणाम दिसू लागले आहेत. आणि म्हणून मानवाच्या कल्यानासाठी वृक्षारोपणना बरोबर झाडांचे रक्षण करणे काळाची गरज आहे. असे विचार पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरीकर यांनी 30 ऑगस्ट 2023 ला आश्रय कॉलनी, तुकूम चंद्रपूर येथील किसनजी आरीकर स्मृती उद्यानात झाडांना राख्या बांधण्याच्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. यावेळी रक्षाबंधनानिमित्त आश्रय कॉलनी येथे वृक्षारोपण व झाडांना राख्या बांधून झाडांचे रक्षण करण्याची सर्व पर्यावरण प्रेमिनी शपथ घेतली. त्यावेळी समितीचे अध्यक्ष डी. के. आरीकर, सचिव हरीश ससणकर, प्रा. डॉ. विद्याधर बनसोड, सौ. बनसोड, प्रा. विजय रोहनकर, रंजना आरीकर, महिला विंग च्या अध्यक्षा स्वाती दुर्गमवार, ईश्वरजी मेंढूळकर, भगवान वारकर, नारायण देवतळे, वैशाली रोहनकर, नम्रता सावंत, आणि परिसरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. वृक्षासाठी राख्या बनविण्याचे काम कु. शौर्या ससणकर हिने केले. कायक्रमाचे संचालन नम्रता सावंत प्रास्ताविक वैशाली रोहनकर तर आभार स्वाती दुर्गमवार यांनी केले.

====≈==================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========≈==============

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here