*गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली शैक्षणिक सत्र २०२३-२४ करिता प्रवेशासाठी मुदत वाढ.*

0
22

=================

*व्यवस्थापन परिषद-अधिसभा सदस्य – गुरुदास कामडी यांच्या मागणीला यश* 

=====================
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कार्यक्षेतील पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयात चालू नवीन शैक्षणिक सत्र २०२३-२४ करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली होती.विद्यापीठ अधिसूचना /जा.क्र./४३४/२०२३ दिनांक २२ आँगष्ट २०२३ नुसार प्रवेश घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर २०२३ पर्यंत होती.
परंतू अनेक विद्यार्थी व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा प्रतिक्षेत असल्यामुळे, दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे प्रवेशा अभावी शैक्षणिक नुकसान होत होते. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन परिषद- अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांच्याकडे प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी व्यवस्थापन परिषद-अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी दिनांक ७ सप्टेंबर २३ रैजी संपन्न झालेल्या व्यवस्थापन परिषदेत शैक्षणिक सत्र २०२४३-२४ करिता विद्यापीठ पदव्युत्तर व संलग्नित महाविद्यालयातील प्रवेशाला १५ दिवसाच्या मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून ,सदर बाब विद्यापरिषदेत ठेवून प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यवस्थापन परिषद-अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांच्या मागणीला यश आले आहे.विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये. यासाठी सर्व प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना विद्यापीठ अधिसूचना गोविग/विद्या/जा.क्र./४९०/२३ दिनांक ११ सप्टेंबर २०२३ नुसार १५ दिवसाची दिनांक २१ सप्टेंबर २३ महाविद्यालयात प्रवेश घेण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे.
गुरुदास कामडी यांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य दिले आहे. शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. याबद्दल प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे व व्यवस्थापन परिषद-अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांचे आभार व्यक्त केले आहे.

====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here