इरई नदीघाटावर मंगळा गौरीपुजन निमित्त थंड जल वितरणाचे आयोजन

0
41

===================

चंद्रपूर : लोकसेवा हीच खरी ईश्वर सेवा या म्हणी प्रमाणे शहरातील विठ्ठल मंदिर वार्डातील इरई नदी घाटावर मंगळा गौरी पुजन निमित्त महिलांसाठी थंड जल वितरणाचा उपक्रम समाजसेवक राहुल देवतळे यांच्या उपस्थित राबविण्यात आला.विठ्ठल मंदिर प्रभागातील इरई नदी घाट दूर असल्याने पायपीट करीत महिलांना त्या घाटावर जावे लागत असल्याने तिथे पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने समाजसेवक राहुल देवतळे यांनी इरई नदी घाटावर थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.सदर उपक्रम गेल्यावर्षी पासून राबविण्यात येत आहे. मंगळा गौरी पुजन व विसर्जनासाठी चंद्रपूर शहरातील महिला मोठया प्रमाणावर या ठिकाणी येत असतात. महिलांच्या सोयीसाठी दोन दिवस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपक्रमाअंतर्गत केली आहे.सदर उपक्रमात सूरज जाधव,विनोद पवार, राजु पेटकर नयन डोईफोडे, शुभम ठाकरे,सुरेश येलमुले , विशाल कामटकर, प्रितम कोदकेलवार यांनी सहभाग घेतला.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here