=======================
आम आदमी पार्टी*
===================
सोमवार दि- 18/09/23
– शहरामध्ये शालेय पोषण आहारासंदर्भातील मदतनीस, स्वयंपाकी तसेच पोषण आहाराच्या प्रश्नाबाबत आम आदमी पक्ष अत्यंत सक्रिय भुमिकेत दिसत आहे. शहरातील शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार मिळत नाही. शासननियमानुसार दर बुधवारी जो पुरक आहार मिळायला पाहिजे ते मिळत नाही. ज्या इमारतीत दोन पाळीमध्ये शाळा भरतात त्यासाठी शासनाचा नियम आहे कि दोन्ही पाळी मध्ये वेगवेगळी भाजी मिळायला पाहिजे परंतु दोन्ही पाळी ला एकच भाजी पुन्हा गरम करून दिली जाते. या आहारासंदर्भात शिक्षकांनी दिलेल्या तक्रारीवर नगरपरिषदेचा सतत दुर्लक्ष दिसून येत आहे. गंभीर बाब तर हि आहे कि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनाच शालेय पोषण आहारासंदर्भातील शासन नियमावली माहित नाही. स्वयंपाकी,मदतनीस महिलांना शासननियमानुसार 2500 रूपये न देता 1000-1500 रूपये दिले जात आहे. या प्रश्नांकडे नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाचा शिष्टमंडळ त्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु सतत एक आठवड्यापासून मुख्याधिकारी नगरपरिषदेत उपस्थित नाहीत. त्यामुळे शिष्टमंडळाने त्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्याधिकारी जयवंत काटकर यांना शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात निवेदन दिले.या पोषण आहार गडबडीत एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येत आहे जिल्ह्यात कुठेही नसलेली केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली हि फक्त बल्लारपूर शहरातच आहे. आता या पध्दतीचा फायदा कोणाला होत असेल? ठेकेदाराला , अधिकाऱ्यांना कि शालेय विद्यार्थ्यांना याचा विचार व्हायला पाहिजे असा प्रश्न पक्षाने उपस्थित केला आहे. यावेळेस उपाध्यक्ष अफजल अली, सचिव ज्योतीताई बाबरे, संघठनमंत्री रोहित जंगमवार, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, युथ सह संघठक प्रज्वल चौधरी, सतीश श्रीवास्तव, भोगे काकू, व पूर्णिमाताई वानखेड़े, नागुबाई, कविता रंगारी, राजेश्वरी जंगमवार, पदमा पंदिलवार, कमला पोकुरवार, कविता तुरनकार, मीना अंडरस्कर, लीला लीडबे, सुंदराबाई वैद्य, बिलस्मिल्ला बी, वर्षा ठाकरे इत्यादी मदतनीस व स्वयंपाकी महिला उपस्थित होत्या.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793