प्राचार्य डाॅ चक्रवर्ती यांची गोंडवाना विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता पदी नियुक्ती!

0
37

==================

सर्वोदय शिक्षण मंडळ संचालीत एल के एम इंस्टिटयुट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज अॅन्ड रिसर्च, चंद्रपुर चे प्राचार्य डाॅ जे एन चक्रवर्ती यांची गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता पदी  नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत विद्यापीठाने पत्र क्र. गों.वि./आस्था/2846/2023, दि. 01/09/2023 नुसार डाॅ. चक्रवर्ती यांचे कडे सदर पदाचा कार्यभार सोपवत असल्याबाबत कळविले आहे.
====================
प्राचार्य डाॅ जे एन चक्रवर्ती हे मागील 25 वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असून 10 पेक्षा अधिक विद्याथ्र्यांनी त्यांचे मार्गदर्शनात पी एच डी प्राप्त केली आहे. 200 पेक्षा अधिक आंतरराष्ट्र्ीय नियतकालीकांत त्यांचे शोध निबंध प्रकाशित झाले असून लंडन स्कूल आॅफ बिझनेस मध्ये मर्जर्स अॅन्ड एक्वीजीशन्स हा त्यांचा शोधनिबंधाचा प्रकाशित झाला असून येथे शोधनिबंध लिहिणारे ते भारतातील ऐकमेव आहेत. ते बिझीनेस एडमिनिस्ट्र्ेशन अॅन्ड मॅनेजमेंट च्या बोर्ड आॅफ स्टडीज चे अध्यक्ष आहेत. आयआयएम अहमदाबाद, आयआयएम बंगलोर, इंडियन इंस्टिटयुट आॅफ सायंस बंगलोर, नरसी मुंजी, जमनालाल बजाज मॅनेजमेंट इंस्टिटयुट या सारख्या नामवंत संस्थांव्दारा आयोजित आंतर राष्ट्र्ीय सेमिनार चे त्यांनी अध्यक्षपद भुषविले आहे. त्यांचे नियुक्ती बद्यल संस्थेच्या अध्यक्षा सुधाताई पोटदुखे, उपाध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डाॅ किर्तीवर्धन दिक्षित, संस्थेचे सदस्य आमदार किशोर जोरगेवार, प्रा.डाॅ राकेश रामटेके, अधिक्षक उमाकांत धांडे, प्रा डाॅ फारूख शेख, डाॅ कविता हिंगाणे, डाॅ नियाज शेख, प्रा रिमा चोपडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here