*चंद्रपुर येथिल जिर्ण झालेल्या ईमारतीवर मनपा कारवाही केव्हा करणार*

0
55

 

चंद्रपुर – मागील वर्षात चंद्रपुर महानगरात भावसार वार्ड जुने राज मंगल कार्यालया जवण जिर्ण झालेली ईमारत ताशच्या खेळातल्या पत्या सारखी अचानक काेसळली. ही घटना कळताच संपुर्ण चंद्रपुर शहर हादरून गेले हाेते. लगेच प्रशासनानी तत्परता दाखवत घटना स्थळी धाव घेवुन रेस्कु ऑपरेशन केल. परिसरातल्या लाेकांच्या पुढे अचानक काेसळलेल्या ईमारतीच्या मलब्यात एक महिला दबुन असल्याची वार्ता संपुर्ण चंद्रपुर शहरला कळताच जाे ताे घटनास्थळी जाऊन बघण्याकरिता गर्दी करित हाेता. ईमारतीच्या मलब्यात दबलेल्या महिलेचे प्राण वाचवण्याकरिता प्रशासनाने आपल्या स्तरावर भरपुर प्रयत्न सुध्दा केला हाेता. यात स्थानिक नागरिकांनी सुध्दा जात, धर्म, बाजुला ठेवुन मानुसकी जाेपत आपले कर्तव्य पार पाडत स्वताहुन ईमारतीचा मलबा हटवण्यास आपले याेगदान दिले. दुपार पासुन सांयकाळ हाेत पर्यंत मलब्याखाली दबलेल्या महिलेस सुखरूप काढण्यात आले. त्या नंतर मात्र प्रशासन कुंभकर्णी गाढ झाेपेतुन जागे झाले. चंद्रपुरातिल वर्षाणुवर्षा पासुन उभ्या असलेल्या व जिर्ण अवस्थेत असलेल्या ईमारतीचे चंद्रपुर महानगरपालिके तर्फे सर्वे ही करण्यात आले. त्यात चंद्रपुरात पंधराच्यावर संख्येत असणार्या जिर्न झालेल्या ईमारती चंद्रपुर महानगरपालिकेच्या लक्षात आल्या. त्या ईमारतीची अवस्था अशी आहे की त्या ईमारती केव्हा ही पडु शकतात. मात्र या घटने नंतर ही महापालिकेला जाग आली नसल्याचे जावनते. अश्या ईमारतीवर चंद्रपुर महानगरपालिकेनी कुठलिच कारवाही अजुन पर्यत तरि केलेली दिसुन येत नाही. नुकतेच एका ईमारतीचे स्लाप काेसळुन घरी काम करत असलेल्या महिलेचा जिव थाेडक्यात बचावला. याची रित सर तक्रार महापालिकेच्या झाेन विभात देण्यात आली. ऐवढे हाेवुन सुध्दा चंद्रपुर मनपा कारवाही करणार की नाही की पुन्हा कुठल्या माेठ्या जिवितहानी हाेण्याची मनपा वाट तर बघत नाही ना ? असा प्रश्न आता चंद्रपुरकरांना पडलेला दिसुन येताे. कारण मनपाच्या जिर्ण झालेलेल्या ईमारती लक्षात येवुन त्या ईमारतीत अनेक कुटुंब आजही वास्तवात आहेत. पुन्हा एकदा अशीच घटना चंद्रपुरात घडु नये म्हनुन तथा कुनाच्या ही जिवाला धाेका हाेउ नये या करिता चंद्रपुर येथिल जनतेचे म्हनने आहे. या विषया संदर्भात लवकर काही तरि निर्णय मनपानी घ्यावे म्हनुन चंद्रपुर मनपा येथे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. परंतु मनपाच्या वतीने कारवाही मात्र शुन्यातच दिसुन येते. मनपाच्या वतीने जिर्ण झालेल्या ईमारती धारकांना नाेटीस बजावल्या आले असुन ईमारत धारक स्वताहुन ईमारत पाडण्याचा मनस्थितीत दिसुन येत नाहीत. म्हनुन आता चंद्रपुर महानगपालिकेनीच अश्या ईमारती पाडण्याकरिता पुढाकार घेवुन याेग्य ती कारवाही करावी. अशी मागणी चंद्रपुरातिल आवाज संघटनेच्या वतीने तथा ईतर काही सामाजिक संघटना आणि चंद्रपुरकरांकडुन हाेत आहे. मनपा तर्फे कारवाही करण्यास विलंब झाल्यास किवा कारनाही न केल्यास अश्या ईमारतीत राहणार्या कुटुंब सदस्यांचा निष्पाप जिव जाईल व त्याची सर्वस्व जवाबदारी ही चंद्रपुर महानगरपालिकेची असेल यात कुठलीच दुम्मत नाही.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========÷÷÷÷=============÷

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here