==========================
*कर्तुत्वान सोहन उईके च्या शिक्षणासाठी ऑफ्रोट फाउंडेशन कडून ५०,०००/- ची मुदत ठेव….*
=======================
*मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपूर व सोहन उईके रा. डोंगर हळदी ता. पोंभूर्णा यांच्या संवादाचा व्हिडीओ संपूर्ण राज्यभर व्हायरल झाला आहे. सोहन याची शिक्षणाविषयी असलेली आवड, मोठा अधिकारी होण्याची महत्वकांक्षा आणि त्यासाठी मेहनत घेण्याची त्याची तयारी ही वाखाणण्याजोगी आहे. आय.ए.एस. अधिकारी होण्याकरीता सुनियोजित अभ्यास ही यशाची गुरुकिल्ली आहे हे त्यांनी उत्तमरित्या पटवून दिले आहे.*
========================
*सोहन जि.प. प्राथमिक शाळेत ८ व्या वर्गात शिकत असून त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत दयनिय आहे. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि एखादया गोष्टीची ओढ जोपर्यंत आपल्यात आहे त्या बळावर आपण कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो. खरी संपती धन नसून ज्ञान आहे व ती शिक्षणामुळेच मिळवू शकतो. हा दृढ अत्मविश्वास शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. ध्येयेवेडया सोहनच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचण येवू नये याकरीता सामाजिक उत्थानासाठी अग्रेसर असणारी ऑफ्रोट फाऊंडेशन चे संचालक अॅड. राजेंद्र मरसकोल्हे श्री नंदकिशोर कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहन याच्या पुढील शिक्षणाकरीता पन्नास हजाराची मदत करण्याचा निर्णय घेवून पंचेविस हजाराचा धनादेश श्री विजय कुमरे अध्यक्ष ऑफ्रोट जिल्हा शाखा चंद्रपूर, श्री शंकर मडावी सचिव, श्री सुनिल गेडाम श्री पुरुषोत्तम सिडाम यांचे हस्ते सोहन व त्याच्या पालकाकडे दि. ०१/१०/२०२३ रविवार रोजी डोंगर हळदी येथील त्याच्या घरी जावून देण्यात आला. दुसरा धनादेश वर्ग १० वी झाल्यानंतर देण्यात येईल.*
=≈=====================
*सोहन याच्यातील आत्मविश्वास अशाच कायम राहू देण्यास व शैक्षणिक वाटचालीस भविष्याकरिता ऑफ्रोट संघटना सदैव पाठीशी राहील अशी कौतुकाची थाप देवून आश्वासित करण्यात आले.*
=======================
*विजय कुमरे शंकर मडावी*
*अध्यक्ष. सचिव*
*आर्गनाईजेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल, जिल्हा शाखा चंद्रपूर*
======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793