*स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनसोहळ्यात आर.टी.ओ. किरण पारखी व जलसंपदा विभागाचे सहा.अभियंता रेणू जीवतोडे यांचा सत्कार*

0
27

—————————————-
ग्रामीण विभागातील शेतकऱ् यांच्या उच्चशिक्षित गुणवंत मुलांचा सत्कार
—————————————-

चंद्रपूर -ताडाळी  

=======================
ताडाळी ग्रामस्थ, स्पर्धा परीक्षा युथ जनरेशन,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ग्रामीण स्तरावरील उच्चशिक्षित विद्याविभूषित गुणवंताचा सत्कार समारंभ सोहळा इंदिरा गांधी सांस्कृतिक ताडाळी सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला डॉ.पंजाबराव देशमुख आय.ए.एस. अकॅडमी अमरावती चे संचालक डॉ.नरेशचंद्र काठोळे मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले होते .प्रमुख अतिथी म्हणून डॉ.दिलीप झलके, माजी अप्पर पोलीस आयुक्त नागपूर , रवींद्र तिराणिक ,महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तथा जनमंच सदस्य नागपूर, प्रा .डॉ. चंद्रकिरण घाटे, श्रीकांत देवळे, प्रमोद रामेकर जनमंच कार्यकारी पदाधिकारी नागपूर,
डॉ. रमेश व-हाटे, सौ .संगीताताई पारखी ग्रा.प.ताडाळी सरपंच, प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी आरटीओ स्पर्धा परीक्षा पास करून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोली येथे सहायक मोटर वाहन निरीक्षक या पदावर रुजू झालेले किरण शालिक पारखी तसेच एम.पी.एस.सी. परीक्षा पास करून जलसंपदा सहा. अभियंता या पदावर नियुक्त झालेल्या कु. रेणू भास्कर जीवतोडे यांचा मान.डॉ. दिलीप झलके माजी अप्पर पोलीस आयुक्त नागपूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .मा. दिलीप झलके यांनी आपल्या अनुभवातून स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी सिविल सर्विस मध्ये व्यक्तित्व ,जिज्ञासा ,चिकाटी व अथक परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे व ते अत्यंत गरजेचे आहे असे विद्यार्थ्यांना याप्रसंगी मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह जिज्ञासा आणि अभ्यासाबाबत गंभीर असणे गरजेचे आहे याबद्दल सांगितले .कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक भास्कर जीवतोडे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सौ. भगत मॅडम यांनी केले .कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ स्पर्धा परीक्षा युथ जनरेशन अशोक पारखी जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ , सुरेश खांडारकर ,विजय ठेंगणे यांनी केले.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here