सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्‍या स्‍वप्‍नातील भारत उभा करू – राहूल पावडे

0
40

======================

भाजपा कार्यालयात सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्‍या जयंतीनिमित्‍त अभिवादन
=======================
चंद्रपूर :-भारताचे लोहपुरूष तथा भारताचे बिस्‍मार्क ओळखण्‍यात येणारे सरदार वल्‍लभभाई पटेल यांची जयंती देशभरामध्‍ये राष्‍ट्रीय एकता दिवस म्‍हणून अतिशय आनंदाचे साजरी करण्‍यात येत आहे. त्‍यांनी स्‍वतंत्र भारताचे राष्‍ट्रीय एकीकरण केले. तत्‍कालिन  विखुरलेल्‍या संस्‍थानांना एकत्र करण्‍याचे महान कार्य केले आहे. त्‍यांच्‍या या योगदानामुळे आजचा एकसंघ सशक्‍त भारत निर्माण झाला आहे. असे प्रतिपादन जिल्‍हाध्‍यक्ष महानगर चंद्रपूर राहूल पावडे यांनी केले.
=============≈≈≈=========
स्‍थानिय गिरणार चौक येथील भाजपा कार्यालयामध्‍ये आज दि. ३१ ऑक्‍टों. २०२३ ला सरदार वल्‍लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्‍यात आली. त्‍यावेळी राहूल पावडे बोलत होते. ते पुढे म्‍हणाले, भारताला जागतिक आर्थिक महासत्‍ता म्‍हणून उभे करण्‍याकरिता सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्‍या विचारांची प्रेरणा घेऊन प्रत्‍येक भारतीयाने कार्य करण्‍याची गरज आहे.या कार्यक्रमाला प्रामुख्‍याने रवी गुरनुले, राजेंद्र खांडेकर, विनोद शेरकि, सोपान वायकर, विठ्ठल डुकरे, अजय सरकार, शीतल आत्राम, दिनकर सोमलकर, रवी लोणकर, सचिन कोतपल्लीवार, आमीन शेख, सूर्यकांत कुचनवार, माया उईके, प्रवीण गुरवार, चांद पाशा सय्यद, राजेश यादव, महेश झिटे,भारती दूधानी, संजय निखारे, भावेश मातंगी, पुरुषोत्तम सहारे, रेनुताई घोडेस्वार, मोनिषा महातव,प्रभा गुडदे, सारिका संदुरकर,  मुक्ता खांडे, अमोल नगराडे, आकाश खिरे,  संतोष जा, सलमा शेख, प्रदीप किरणे, रामकुमार आकापेल्ली, कुंदन सिंग, गणेश लोणकर, प्रलय सरकार, सुनीता जयस्वाल, शेखर रेड्डी, गोपाल जोशी, जयश्री आत्राम , अनिल ॲडुर, अमोल मत्ते, जहीर कादरी, आकाश मस्के,  मोरेश्वर खैरे, रवी चेहरे, रितेश वर्मा, बाळू कोलकर, उमेश आष्टणकर मधुकर राऊत आदींची उपस्थिती होती.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here