Home
Home चंद्रपूर भव्‍य नेत्रचिकीत्‍सा व चष्‍मे वितरण शिबीराचे आयोजन

भव्‍य नेत्रचिकीत्‍सा व चष्‍मे वितरण शिबीराचे आयोजन

0
87

=========================

भाजपा चंद्रपूर महानगर उपाध्‍यक्ष सुरज पेदुलवार यांच्‍या वाढदिवसानिमीत्‍त नाविण्‍यपूर्ण उपक्रम.

============================

राजकीय, सामाजिक, सांस्‍कृतीक व शैक्षणिक उपक्रमांच्‍या माध्‍यमातुन अल्‍पावधीतच प्रकाशझोतामध्‍ये आलेले व्‍यक्‍तीमत्‍व  सुरज पेदुलवार भाजपा चंद्रपूर महानगर उपाध्‍यक्ष यांच्‍या वाढदिवसानिमीत्‍त भव्‍य नेत्रचिकीत्‍सा व चष्‍मे वितरण शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे.

========================

दिनांक १९ नोव्‍हेंबर २०२३ रोजी युवा नेतृत्‍व सुरज पेदुलवार यांच्‍या वाढदिवसानिमीत्‍त सकाळी १० वा. पासुन दुपारी ३.०० वाजेपर्यंत सुरज पेदुलवार यांचे कार्यालय डॉ. सौ. जया भलमे यांच्‍या दवाखान्‍यासमोर बगडखिडकी रोड, चंद्रपूर  येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नेत्रचिकीत्‍सा व चष्‍मे वितरण शिबीराचे आयो‍जन करण्‍यात आले आहे. या आधी आरोग्‍य तपासणी, शासकीय योजनांची माहिती, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड अपटेड व नविन आधार कार्ड तयार करणे, दिव्‍यांग बांधवांना दिव्‍यांग साहीत्‍य उपलब्‍ध करून देणे, आयुष्‍यमान भारत कार्ड तयार करणे, रक्‍तदान शिबीर यासारख्‍या शिबीरांच्‍या माध्‍यमातुन सामाजिक कार्य करीत गरजूंना मदत करण्‍यात आली आहे. सुरज पेदुलवार यांनी कोविड-१९ काळामध्‍ये रूग्‍णसेवा केल्‍याबद्दल त्‍यांना महाराष्‍ट्र बेलदार समाजाच्‍या वतीने कोरोना योध्‍दा पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे. या शिबीराचा लाभ सर्वांनी घ्‍यावा असे आवाहन सुरज पेदुलवार मित्र परिवारातर्फे करण्‍यात आले आहे.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here