*छायांक तिराणिक पीएच.डी. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण*

0
36

===========================

कोरोना काळातील विविध दुःखद प्रसंगावर मात करीत केले यश संपादन.
—————————————

आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी चाललेली धडपड
—————————————-

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तर्फे घेण्यात आलेल्या पीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये छायांक रामकृष्ण तिराणिक यांनी पहिल्याच प्रयत्नात सुयश मिळवले आहे. छायांक तिराणिक याने राज्यशास्त्र विषयात पीईटी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
पीएच.डी. प्रवेशासाठी प्रवेश चाचणी म्हणून पीईटी परीक्षा विद्यापीठाकडून घेण्यात आली होती. यामध्ये छायांक रामकृष्ण तिराणिक यांनी यश संपादन केले आहे. छायांक तिराणिक हे भद्रावती येथील रहिवासी असून, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रामकृष्ण तिराणिक यांची चिरंजीव आहेत. आदिवासी कुटुंबातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडिलांनी शिक्षण पूर्ण करीत विस्तार अधिकारी ते गटशिक्षणाधिकारी पर्यंत मजल गाठली होती. पत्रकारिता ते संपादक असा प्रवास करून( पत्रकारितेमध्ये मास कम्युनिकेशन )बरोबरच इतर पदव्या संपादित करीत उच्चशिक्षण पूर्ण केले होते . मुलांनी उच्चशिक्षित व्हावं! सामाजिक दायित्व सांभाळाव वडिलांची खूप इच्छा होती. छायांकनी आपले मार्गदर्शक प्रेरणास्थान असलेले वडील छत्रछाया हरपले पाठोपाठच कला शिक्षक असलेले काका, आते भाऊ, आणि नातवंडांवर आपुलकीने प्रेम करणारी दादी गमावली अत्यंत दुःखद प्रसंग आपल्या वाटायला आले असताना यातही शिक्षण घेण्याची जिद्द कायम ठेवीत छायांकणे प्रशासकीय सेवा अभ्यासक्रम पूर्ण करीत. एम. ए. (लोकप्रशासन). एम. ए. (राज्यशास्त्र) व बीएड उच्च श्रेणीत उत्तीर्ण आहे. छायांकला साहित्य लेखन ,राजकीय विश्लेषण – संभाषण, वक्तृत्व, वाद परिसंवाद यात आवड आहे. पीएच .डी . प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केलेल्या छायांकला वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आनंद मिळणार आहे. छायांकणे आपल्या यशाचे श्रेय आई बाबा व गुरुजन मंडळी सर्व आप्त परिवार आणि मित्रांना दिले आहे. त्यांच्या यशाबद्दल आदिवासी समाजातील विविध संघटना व चंद्रपूर कलाअकादमीच्या वतीने अभिनंदन केले आहे.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here