======================
▪️अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, जिल्हा दुष्काळ जाहीर करावा- शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे
=======================
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करीत असलेले उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या आंदोलनाची प्रशासन व शासनाकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलक शिवसैनिकांचा संयम सुटला असून, सोमवारी दुपारी शिवसैनिकांनी चंद्रपूर जिल्हा पीक विमा कंपनीच्या कार्यालयात धाव घेत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली.
=======================
विशेष म्हणजे, प्रशासनाने व शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास विमा कंपनीचे ऑफिस फोडू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्याकडून देण्यात आला होता.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदोलन केले आहे. जिल्ह्यातील महसूल मंडळांकडून अतिवृष्टीत बाधितचा अहवाल देऊन ही. अन्य मंडळांमध्येही अतिवृष्टी आणि पुराच्या जबर तडाख्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला.२ लाखच्याu वरील हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले हाेते.
========================
अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक व शेत जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने मंजूर करावे. रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानाचा मदत मिळालेली नाही. या नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आला.यावेळी युवासेनेचे जिल्हाधिकारी विक्रांतभाऊ सहारे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सिक्कीभैय्या यादव , उपजिल्हा प्रमुख शालिक फाले , शहर प्रमुख बल्लारपूर प्रकाश पाठक माजी महानगर प्रमुख प्रमोदभाऊ पाटील , तालुका प्रमुख संतोषभाऊ नरुले ,तालुका प्रमुख मुलं प्रशांत गट्टूवार ,तालुका प्रमुख गोंडपिपरी सूरज माडूरवार, जिल्हा संघटिका उज्वलाताई नलगे , युवतीसेना जिल्हाधिकारी सौ रोहिणीताई पाटील , विनयभाऊ धोबे , सुमितभाऊ अग्रवाल , हेमराज बावणे , बाळूभाऊ भगत, बाबा साहू ,राहुलभाऊ वीरूटकर ,विकासभाऊ वीरूटकर ,सिक्किभाई खान ,महेशभाऊ खंगार, रिझवानभाई पाठव , शहाबाज शेख, शिवा वझरकर , वैभव काळे गिरीशभाऊ कटारे पदाधिकारी व युवासेनेचे पदाधिकारी व महिला आघाडी व युवती सेना असंख्य प्रमाणात उपस्थित होते
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793