श्री केतेश्वर स्वामी महाराज जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत

0
36

==========================

श्री केतेश्वर स्वामी महाराज जयंती निमित्त समाज बांधवांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी लक्ष्मी नारायण मंदिर जवळ सपत्नीक शोभयात्रेचे स्वागत केले. यावेळी सुनिल वासमवारपंकज जोरगेवारअजय चंदावारनरेंद्र जोरगेवारसुरेश पुट्टेवारमोहन जवाडेगुरुदेव पार्लेवारनकुल वासमवारप्रशांत जोरगेवारगजानन मंचलवारगौरव जोरगेवारकेतन जोरगेवारसोनु दर्शनवारराजु पुटटेवार वर्षा गयनेवारसविता सुलभेवारचैताली पदमगीरवार आदींची उपस्थिती होती,

=========================
बुरुड समाजाचे आराध्य दैवत महान तपस्वी श्री केतेश्वर स्वामी महाराज यांची जयंती समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. मिलन चौक येथील केतेश्वर मंदिर येथून या शोभायात्रेला सुरवात झाली. सदर शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने होत जटपूरा गेटला वळसा घालुन पुन्हा केतेश्वर मंदिर येथे पोहचली. दरम्यान लक्ष्मी नारायण मंदिर जवळ सदर शोभायात्रा पोहचली असता आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभायात्रेचे स्वागत करत श्री केतेश्वर स्वामी महाराज यांच्या प्रतिमेला मार्लापण करून  नमन केले. या शोभायात्रेत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here