*सतिश काळे ला आर्थिक मदती साठी मनसे चे निवेदन*

0
46

========================

   *जिवती*

========================

तालुक्यातील शंकर पठार येथे अकरा केवी विद्युत तार तुटल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या *सतीश गोविंद काळे* या मुलाचे उपचार चंद्रपूर ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथे सुरू असून त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे . गोविंद काळे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी महावितरण तर्फे आपल्या स्तरावर आर्थिक मदत करण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे जिल्हा सचिव *चंद्रप्रकाश बोरकर* यांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष *हकानी शेख, नागेश खांडेकर , सुधीर चिटगिरे, सारिका नंदेवार* यांनी आज दि 11/12/2023 ला मा. कार्यकारी अभियंता साहेब तालुका जिवती जिल्हा चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
9/ 12 /2023 शनिवारला शंकर पटार मध्ये महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका सहा वर्षीय मुलाला 11 केवी चा करंट लागून तो गंभीर जखमी झाला त्याचे उपचार ग्रामीण रुग्णाल चंद्रपूर येथे सुरू आहे . स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना देण्यास फोन लावले असता फोन कोणीही उचलला नाही . त्या गावात असलेली डीपी तात्काळ स्थलांतरित करण्यात यावी आणि लाईनमन व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे 8 दिवसाच्या आत दोशींवर कारवाई न केल्यास दिनांक 20/ 12 /2013 महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे महावितरण कंपनीविरुद्ध कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवेदनातून दिले आहे.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here