======================
50 लक्ष रुपयातून होणार धानोरा येथील जगन्नाथ बाबा मठाचा विकास
========================
चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील विकासकामांसाठी विविध योजनेंतर्गत 2 कोटी 65 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून आज शनिवारी या विकास कामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले आहे. यात 50 लक्ष रुपयातून धानोरा येथील जगन्नाथ बाबा मठाचा विकास करण्यात येणार आहे.
==========================
आज पार पडलेल्या भूमीपूजन कार्यक्रमाला ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, डॉ. रेमेश वराटे माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, बंडू धोटे, सविता पोले, अंजली उपाध्याय, वंदना कडू, मनोज वांढरे, साखरवाहीचे सरपंच निरजकुमार बोंडे, उपसरपंच सिद्धार्थ कवाडे, सदस्य सुनंदा वाढई, संदिप कुळसंगे, विलास भगत, भरत तानकर, मनोज वाढई, शेखर काकडे, नंदकिशोर वासाडे , दिवाकर पिंपळशेंडे, नामदेव बोबडे, गजानन बोढे, दामोदर गौरकर, दिवाकर बोढे, शंकर गोरकार, रमेश ठावरी, संदीप बोढे, भास्कर गोखरे, गजानन माणूसमारे, नवनाथ गोखरे, पांडुरंग आमडे, गणेश निखाडे, विजय सूर्यवंशी, दशरथ बोढे, मायाताई ठावरी आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने मतदार संघाच्या विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिल्या जात आहे. या निधीतून प्रलंबित विकास कामांना गती मिळाली आहे. नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 40 कोटी हुन अधिक रुपयांचा निधी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून शहरी व ग्रामीण भागाचा विकास केल्या जाणार आहे.
तर शहरातील विकासकामांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी 2 कोटी 65 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून 45 लक्ष रुपये खर्च करत तुकुम येथील श्री माता निर्मला देवी परिसर येथे अभ्यासिका तयार करण्यात येणार आहे तर साखरवाही येथे रस्ता, नाली व ईतर विकासमांसाठी 50 लक्ष रुपये खर्च केल्या जाणार आहे. धानोरा पिपरी येथे 50 लक्ष रुपये खर्च करुन सदगुरु जगन्नाथ बाबा देवस्थान येथे विकास काम केल्या जाणार आहे. वृंदावन नगर येथील विकासकामासाठीही 1 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी खर्च केल्या जाणार आहे.
दरम्यान या सर्व विकासकामांचे आज शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, शहर विकास, सामाजिक न्याय विभाग, ग्रामविकास निधी अंतर्गत आपण 2 कोटी 65 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. या निधीतून येथे होत असलेल्या विकासकामांमुळे या भागातील सोयी सूविधेत भर पडणार आहे. मतदार संघातील विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करता येत असल्याचा आनंद आहे. आज येथे भूमीपूजन कार्यक्रम संपन्न झाला आहे. मात्र होत असलेले हे काम उत्तम आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी या कामांकडे नागरिकांनीही लक्ष ठेवावे. योग्य त्या सूचना कराव्यात असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमांना स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
========================-
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069