======================
*अहेरी बाजार समिती सभापती कंकडालवार यांच्या हस्ते भव्य टेनिस बाॅल सामनेचे उदघाटन!!*
==========================
भामरागड : स्व.श्री.सीताराम हरिदास सडमेक(कामगार)स्मृती प्रित्यर्थ जय श्रीराम युवा क्रिकेट मंडळ भामरागड द्वारा आयोजित येथे भव्य टेनिस बाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आज या स्पर्धेचे उदघाटक म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते पार पडले तसेच माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा मंडळातील सदस्यांनी शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आले.
=======================
या स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व भामरागडचे न.पं.नगराध्यक्षा सौ.रामबाई कोमटी महाका यांच्या कडून प्रथम पारितोषिक 71,000/- देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक मा.सर्व अधिकारी वर्ग भामरागड तर्फे 51,000/- तृतीय पारितोषिक जय श्रीराम युवा क्रिकेट मंडळ भामरागड तर्फे कडून 21,000/-असे या स्पर्धेसाठी तीन पारितोषिक देण्यात येत आहे.
======================
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भामरागडचे न.पं.नगराध्यक्षा सौ.रामबाई कोमटी महाका,नरोटी साहेब,कृ.उ.बा.स. संचालक दादू भैय्या, श्री.दिलीप उईकेनगरसेवक भामरागड,बालूभाऊ बोगामी कॉग्रेस तालुका अध्यक्ष भामरागड,तपेश हलदार,आशिष सुपी,शामराव येरकलवार,मलेश तलांडी सरपंच मडवेली,नंदूभाऊ सरपंच पारायनार,मज्जी माजी सरपंच पल्ली,बाळूभाऊ पोरेड्डीवार,कु.हीचामी ताई सरपंच आरेवाडा, डोलेश मडावी माजी सरपंच कंदोळी,किशोर कडंगा सरपंच होड्री,नगरसेवक,निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली,अहेरी प्रशांत गोडसेलवार राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069























