========================
*बेघर निराश्रित नागरिकांना दिलासा*
=========================
*चंद्रपूर*
=======================
*चंद्रपूर – दरवर्षी प्रमाणे यंदाही शरणमं बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्था चंद्रपूर तर्फे बेघर निराश्रित रात्री फूटपाथ वर थंडीत कुडकुडत झोपणाऱ्या नागरिकांना कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे या हेतूने मागील काही दिवसांपासून ब्लँकेट चे वाटप करण्यात येत आहे, आठवडाभरा पासून थंडीचा जोर वाढला आहे, वातावरणातील बदलामुळे ताप सर्दी खोकल्याचे रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे, कडाक्याच्या थंडीचा सामना करीत फूटपाथ वर झोपणाऱ्या निराधार बेघर निराश्रित नागरिकांना कडाक्याच्या थंडीपासून बचाव व्हावा या उद्देशाने शरणम बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्था चंद्रपूर तर्फे दरवर्षी हिवाळ्यात ब्लँकेटचे वितरण करण्यात येते,अनेक गरजू नागरिकांना याचा लाभ मिळाला असून तापमानात वाढ होईपर्यंत सदर उपक्रम राबविला जाईल असे संस्थेचे अध्यक्ष श्री शेखर तावाडे यांनी कळविले आहे.*
====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069