मतुआ महासंघाचे सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय योगदान – आ. किशोर जोरगेवार

0
39

========================

मतुआ महासंघाच्या वतीने चतुर्थ वार्षिक मतुआ महोत्सवाचे आयोजन

=======================

   *चंद्रपूर*

=====================

मतुआ महासंघाच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविल्या जात आहे. धार्मिक क्षेत्रातही मोठे काम मतुआ महासंघाच्या वतीने होत आहे. समाजाकडून त्यांना मिळत असलेले लक्षणीय सहाकार्य कौतुकास्पद असून मतुआ महासंघाचे सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
चंद्रपूर येथील जागृत श्री श्री हरिचांद ठाकुर मंदिर येथे मतुआ महासंघाच्या वतीने चतुर्थ वार्षिक मतुआ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर, यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. तसेच या प्रसंगी शोभा मा ठाकुर, मंजुर ठाकुर, मतुआ महासंघाचे डॉ. जे. बी महालीक, सचिव शैलेन स्वराती, कोषाध्यक्ष निर्मेलेंद हलदार, छत्तीसगड चे रवी गासाई, रमेन बर, दुलाल गोसाई, डाॅ. अमल पोद्दार यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. किशोर जोरगेवार म्हणाले कि, समाजाला वेळो वेळी योग्य दिशा देत राहण्याची गरज असते. सध्या अनेक सामाजिक सेवाभावी संस्था, संघटनच्या माध्यमातून हे ईश्वरिय कार्य केल्या जात आहे. मतुआ महासंघही समाजात धार्मिक वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहे. आपण दरवर्षी सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत असता यातील सातत्यता अशीच कामय ठेवण्याचे आवाहण यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
मतुवा महासंघाअंतर्गत समाजाचा विकास, शिक्षण, सांस्कृतिक सुरक्षा आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी अनेक कार्यक्रम घेत या  पैलूंवर काम केल्या जात आहे.  ही संस्था सामाजिक आणि सांस्कृतिक सौहार्द वाढविण्याचे कार्य करत आहे. समाजातील सदस्यांना एकत्र येण्यास प्रोत्साहित करत आहे. आपल्या या कार्यात लोकप्रतिनीधी म्हणून आमचे नेहमी सहकार्य असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. सदर कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here