*विविध 100 श्रद्धास्थानी स्वच्छता अभियान राबविणार – आ. किशोर जोरगेवार*

0
20

========================

काळाराम मंदिर येथे स्वच्छता अभियान, नागरिकांचा उत्स्फृत प्रतिसाद

 =========================

     चंद्रपूर मतदार संघात आपण मंदिर स्वच्छता अभियानाला सुरवात केली असुन चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिरापासून आपण याचा शुभारंभ केला आहे. आज आपण चंद्रपूरातील प्राचीन काळाराम मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविले असुन येत्या काही दिवसात चंद्रपूरातील विविध 100 श्रध्दा स्थानांची स्वच्छता करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

===========================

     आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील प्राचीन  असलेल्या काळाराम मंदिरात स्वच्छता अभियान राबविले. यावेळी श्री माता महाकाली महोत्सव समिती, चंद्रपूर महानगरपालिका आणि यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटनेने सहभाग घेतला होता. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, विश्वस्त मलिंद गम्पावार, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, ग्रामीण तालुकाध्यक्ष राकेश पिंपळकर, सविता दंढारे, सायली येरणे, भाग्यश्री हांडे, आशा देशमूख, अल्का मेश्राम, शंकर दंतुलवार, राम मंढे, अॅड. परमहंस यादव, राहुल मोहुर्ले, हेरमन जोसेफ, देवा कुंटा, तापोष डे, बबलू मेश्राम आदींची उपस्थिती.

========================

     येत्या 22 जानेवारीला अयोध्येत आयोजित रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेची तयारी जोरात सुरु आहे. महाराष्ट्रातही 22 जानेवारीला राज्यभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान राज्यभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात यावे असे आवाहण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत आमदार किशोर जोरगेवार यांनीही मंदिरामध्ये स्वच्छता मोहिम सुरु केली असुन याची सुरुवात चंद्रपूरची आराध्य दैवत असलेल्या माता महाकालीच्या मंदिरातून करण्यात आली होती.

=======================

       दरम्यान आज चंद्रपूरातील प्रसिध्द असलेल्या पुरातण काळाराम मंदिर येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मंदिर परिसर संपूर्णरित्या स्वच्छ करण्यात आला. पुढेही हा उपक्रम सुरुच राहणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here