*आदिवासी बांधवांनी केला ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार*

0
33

===========================

*शहरी भागाला शबरी योजनेचा लाभ मिळाल्याने आनंद* 

=========================

*चंद्रपूर, दि. २० :* आदिवासी समाजातील शहरी भागात वास्तव्य करणाऱ्या गरीब बांधवांसाठी शबरी घरकूल योजना मंजूर करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे यासंदर्भातील शासन निर्णय काढण्यात आला आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांनी केलेल्या या प्रयत्नांमुळे आदिवासी बांधवांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

============================

ना. श्री. मुनगंटीवार यांनी घरकूल योजना मंजूर करून घेतली. या योजनेचा लाभ आता शहरी भागात नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो आदिवासी बांधवांना घेता येणार आहे. शबरी घरकूलची मागणी चंद्रपूर जिल्ह्यातून ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली. आता त्याचा लाभ संपूर्ण महाराष्ट्राला मिळाला आहे, असे विचारही आदिवासी समाजातील मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

=========================

आदिवासी समाजातील विविध संघटना तथा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष धनराज पुनम कोवे यांच्यावतीने ना. श्री. मुनगंटीवार यांचा आदिवासी पारंपरिक वाद्य ढोलताशाच्या गजरात पुष्पहार, पिवळा शेला घालत सत्कार करण्यात आला. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रपूरच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित या कार्यक्रमात मा. ना. मुनगंटीवार यांचा गौरव करण्यात आला.

============================

यावेळी बोलताना मा. ना. मुनगंटीवार म्हणाले, आपण सदैव आदिवासी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहो. आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसाठी नेहमी नावीन्यपूर्ण योजना अमलात आणल्या. आदिवासी महिलांना रोजगार मिळावा यासाठी अगरबत्ती प्रकल्प आपण जिल्ह्यात आणला. विर बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी पुढाकार घेतला. आदिवासी विद्यार्थ्यांना एव्हरेस्टवर पाठविण्यासाठी आपण पुढाकार घेतला. आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशातही शिक्षणासाठी मदत मिळवून दिली. आदिवासी युवकांना रोजगाराभिमुख कार्यक्रमही राबविले.

============================
मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात होत असलेले विकासकामे यावर प्रभावित होऊन शेकडो आदिवासी बांधवांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा देऊन मा. ना. मुनगंटीवार यांनी स्वागत केले. पक्ष प्रवेशासाठी भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष श्री. राहुल पावडे, माजी महिला बालकल्याण सभापती चंद्रकलाताई सोयाम, अनुसूचित जमाती मोर्चा महानगराचे जिल्हाध्यक्ष श्री. धनराज कोवे, अनिल सुरपाम यांनी पुढाकार घेतला.

===========================

यावेळी माणिक सोयाम, शालिकराव उईके, सोमाजी कातलाम, गोपाळ मसराम, भारत सोयाम, रामू मेश्राम, सुनील तलांडे, बाबाराव मंगाम, केशव कुभरे, राजू कुमरे, मुकेश सुरपाम, किसन मंगाम, मधुकर गावंडे, शंकर सोयाम, इंदिरा चौधरी, यशोदा आत्राम, आशा आत्राम, सुनंदा उईके, वर्षा आतराम, शोभा मडावी, सरीता शिडाम आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

============================

कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा महामंत्री ब्रीजभूषण पाझारे, रामपाल सिंह, रुद्रनारायण तिवारी, बंडू गौरकार, रवी लोणकर, दिनकर सोमालकर, विठ्ठल डुकरे, संदीप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, अरविंद मडावी, शुभम गेडाम, यशवंत शिडाम, किशोर आत्राम, गीता गेडाम, मायाताई उईके, ज्योती गेडाम, शीतल आत्राम, तृष्णा गेडाम, जयश्री आत्राम, लिनाताई कुसराम, तानेबाई मेश्राम, मोनिका मडावी, सीमा मडावी, अनिता पुसाम, प्रवीण गेडाम, खेमराज कोडापे आदी उपस्थित होते.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here