*बल्लारपूरच्या जनतेसाठी MJP ने अनेक समस्या निर्माण केले आहे*

0
24

========================

*आम आदमी पार्टी, बल्लारपूर*

=========================

मंगळवार दिनांक:- 23 जानेवारी 2024 रोजी पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP), बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले, शहरात गेल्या अनेक दिवसांपासून 1) लोकांना स्वैरपणे बिल पाठवल्या जात आहे 2) नव्याने टाकलेली मुख्य पाईप लाईन जागोजागी फुटत आहे, 3) घरांमध्ये लावलेल्या नवीन नळ कनेक्शनचे पाईप लाईनचे काम निरुपयोगी ठरत आहे, 4) पिण्याच्या पाण्याची समस्यामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे, पाणी नियमित दिले जात नाही, एक-दोन दिवसाच्या आड केवळ 30 ते 40 मिनिटेच नळ सोडला जात असून, बल्लारपूर शहरातील नागरिक त्रस्त आहेत. त्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे विद्यानगर वॉर्डाजवळील परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या या सर्व समस्यांबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) यांना निवेदन देण्यात आले. या सर्व समस्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टी बल्लारपूरच्या जनतेला सोबत घेऊन लवकरच आक्रमक भूमिका घेईल असे आव्हान शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी केले आहे.
यावेळी शहर प्रवक्ते आसिफ हुसेन शेख, सचिव ज्योतीताई बाबरे, गौतम रामटेके, संजय खोब्रागडे, पंकज झिलटे, सुनील इंगला, बल्लारपूर शहरातील समस्याग्रस्त नागरिक व आदी उपस्थित होते.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here